Sindhudurg Chipi Airport  Dainik Gomantak
ब्लॉग

गोवा पर्यटन व्यावसायिकांना आतापासूनच 'चिपी'ची धास्ती

सिंधुदुर्गच्या तुलनेत गोव्यात हॉटेल्‍सचा दर जास्त असल्‍याने पर्यटक गोव्याऐवजी सिंधुदुर्गाला पसंती देण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सुदेश आर्लेकर

म्हापसा: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा (Chipi Airport) थोडाफार लाभ गोव्याला (Goa) होणार असला तरी आगामी काळात पर्यटनदृष्ट्या तेथील विकास झाल्यानंतर गोव्यातील पर्यटन (Goa Tourism)व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पण त्‍यासाठी तीन-चार वर्षे जावी लागतील. तरीसुद्धा पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्या गोव्यातील व्यावसायिकांनी (Goa Businessman) आतापासूनच त्याची धास्ती घेतली आहे. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे सिंधुदुर्गच्या (Sindhudurg) तुलनेत गोव्यात हॉटेल्‍सचा (Goa Hotels) दर खूपच असल्‍याने पर्यटक गोव्याऐवजी सिंधुदुर्गाला पसंती देण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या परिसरात चांगल्यापैकी समुद्रकिनारे आहेत. गोव्यासारखाच तोही परिसर निसर्गसंपन्न आहे. कोकण भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तिथे विकासात्मक कामांसाठी विशेष पॅकेजही जाहीर केले आहे. त्यामुळे तिथे पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी विपुल संधी आणि पोषक वातावरणही आहे. त्याचा थेट फटका येत्या काही वर्षांनंतर गोव्याला बसणार आहे, असे उत्तर गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांचे मत आहे. आता सावध पावले उचलली पाहिेजेत, असेही त्‍यांचे म्‍हणणे आहे.

पर्यटनात शिस्‍त हवी

बार्देश तालुक्यातील एक हॉटेल व्यावसायिक यासंदर्भात म्हणाला, ‘पर्यटक गाईड’ या गोंडस नावाखाली येथे येऊन व्यवसाय करणाऱ्या गोव्याबाहेरील व्यक्तींवर, पर्यटकांकडून प्रमाणाबाहेर दर आकारणी करणाऱ्या टॅक्सीचालकांवर तसेच लाचखोर पोलिसांवर सरकारने नियंत्रण ठेवणे आता गरजेचे बनले आहे. पर्यटन व्यवसायात शिस्त आणली पाहिजे. काही पर्यटक गैरकृत्यांत गुंतलेले आढळतात. त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करावी. गोव्याबाहेरील टॅक्सींना प्रतिबंध करावा.

उपाययोजना हवी

गोव्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या परप्रांतीयांमुळे गुन्हेगारी घटना वाढलेल्या आहेत. विनयभंग, बलात्कार, अमली पदार्थांचा व्यवहार, मारहाण, खून, चोऱ्या, काही पोलिस तसेच स्थानिक लोकांकडून पर्यटकांची होणारी सतावणूक आदी घटनांमुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे. ते होऊ नये यासाठी गोवा सरकारने विशेष खबरदारी घेऊन त्यासंदर्भात उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. गोव्याची प्रतिमा उजागर करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे.

चिपी विमानतळ कार्यान्वित झाला ही सध्या तरी गोव्याच्या दृष्टीने चांगली बाब होय. परंतु आगामी काळात तिथे पर्यटन सुरू झाल्यानंतर गोमंतकीय व्यवसायिकांना मोठा फटका बसणार आहे. याचे भान ठेवून गोवा सरकारने पर्यटन क्षेत्राच्या बाबतीत गोव्याची प्रतिमा उंचावण्‍यासाठी आतापासूनच प्रयत्नशील राहावे.

-चंदन मांद्रेकर, टॅक्सी व्यावसायिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT