goa Dainik Gomantak
ब्लॉग

पावसाळा हवा आणि भजी

कांदाभजी करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. एरवी मोठ्या चवीनं खाल्ल्या जाणाऱ्या कांदाभजीला नैवेद्याच्या ताटात मात्र मान नसतो.

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्विनी प्रभुणे-नायक

बाहेर एका लयीत पाऊस कोसळत असताना आले घातलेला, वाफाळलेला चहा आणि गरम गरम कांदा भजी खाण्यातली मजा अनुभवण्याचे सध्या दिवस आहेत. ऋतू बदलामुळे आपलं खाद्यजीवन पण बदलतं. आता हेच बघा ना अगदी काल परवा पर्यंत उन्हाने अंगाची लाहीलाही होत असताना आपलं शरीर थंडपणा मागत होतं.

थंडपेय, आईस्क्रीम खाऊन आपणही त्या रणरणत्या उन्हात गारवा शोधत होतो. तेच आता पाऊस सुरु होताच काहीतरी चमचमीत खावं अशी जीभेची मागणी सुरु झालीय. एरवी साधा चहा चालायचा पण पाऊस सुरु होताच चहासोबत गरम गरम भजी खावीशी वाटू लागते.

पावसाच्या दिवसांमध्ये आपण भजी खाणं टाळू शकत नाही, साधारणपणे भजी सर्वांना आवडते. पावसाचं आणि भजींचं नातं काही वेगळं आहे आणि त्यातही कांदाभजीचं नातं काही निराळंच. कांदाभजीची अशी तीव्रतेनं कधी आठवण येत नाही. पण पाऊस सुरु होताच कांदा भजी बनवणं हा एक ''विधीं''वत सोहळा बनतो.

कांदा उभ्या पध्दतीने बारीक चिरून, त्यात मीठ घालून पाच मिनिटं ठेवून द्यायचं. मग त्यात थोडासा ओवा, थोडेसे धणे हातावरच जरासे मुरडून घेऊन ते त्या चिरलेल्या कांद्यात घालायचे. मग त्यात हळद- हिंग आणि मिरची पावडर घालायची. कोथिंबीर बारीक चिरुन त्यात घालायची. सर्वात शेवटी यात बेसन घालून हलक्या हाताने हे सगळं मिश्रण एकत्र कालवायचं. यात थोडासा खायचा सोडा घालायचा आणि गरम तेलात भजी तळून घ्यायची. छान कुरकुरीत होईपर्यंत भजी तळायचे. भजी खाताना छान वाटतं. पण ती बनवताना किती बारीकसारीक तयारी करावी लागते. यातली एखादी जरी गोष्ट विसरली तरी कांदा भजीच्या चवीत काहीतरी कमी आहे असं वाटत राहतं.

खेकडा भजी

पुण्याजवळ असलेल्या सिंहगडावर तुम्ही गोला तर तिथं ''खेकडा भजी मिळेल'' अशी पाटी दिसते. मी पहिल्यांदा सिंहगडावर गेले तर ही पाटी वाचून अश्चर्यचकीत झाले. ही मंडळी खेकड्याची भजी का करतात असा प्रश्न पडला. मग चौकशी अंती समजलं की इथली खेकडा भजी ही खेकड्याची नाहीतर ती कांद्याचीच आहे. या भजीच्या वाकड्या तिकड्या आकारामुळे तिचं नाव ''खेकडा भजी'' असं पडलंय.

सिंहगड चढून गेल्यावर हातात गरम गरम खेकडा भजी आणी छान छोट्याशा मडक्यात लावलेलं दही खाताना सगळा क्षीण विसरायला होतं. मग फक्त एकाच प्लेटनं आपलं पोट भरत नाही. भजी अजून खावीशी वाटते. जीभेला चटक लागावी तशी एकामागे एक भजी गट्टम होते.

कांदा भजीचं नाव काढताच मला आठवण येते ती सुरेश आमोणकर यांची. ''पाऊस सुरु झाला की मी तुमच्याकडे येतो. छानशी कांदाभजी कर'' असं ते म्हणायचे. न संपणाऱ्या गप्पा आणि कांदाभजी हे पावसाच्या दिवसात ठरून गेलेलं असायचं. कांदाभजी करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. एरवी मोठ्या चवीनं खाल्ल्या जाणाऱ्या कांदाभजीला नैवेद्याच्या ताटात मात्र मान नसतो. बटाटा भजी तिथं भाव खाऊन जाते.

पण म्हणून कांदाभजीचं महत्त्व अजिबात कमी होत नाही. भारतीयांचं आवडतं स्नॅक्स म्हणून भजीकडे बघितलं जातं. भारतभर कुठेही जा. वेगवेगळ्या रूपात भजी आपल्यासमोर येते. कांदाभजी तुम्ही पावासोबत खा, चटणीसोबत खा किंवा तळलेल्या मिरचीसोबत खा. तुम्हाला त्याची चटक लागते. या दिवसात बटाट्याची, ओव्याच्या पानांची भजी, पालकची, कोबीची, ढोबळी मिरचीची ''भजी प्लॅटर'' एकदा तरी करावंच लागतं. मग वर्षभर भजी खायला नाही मिळाली तरी चालते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टाबाजीचा पर्दाफाश; ५ जणांना अटक, सुमारे लाखभर रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

Dudhsagar Jeep Committee: दूधसागर जीप असोसिएशनला माजी मंत्री पाऊसकरांचा जाहीर पाठिंबा; 'त्यांची मागणी रास्त...'

Goa Unemployment: गोव्यातल्या घरफोडीच्या घटनांचा बेरोजगारीशी संबंध? काँग्रेस नेत्याने मांडले तर्क

Migrants Problem in Goa: 'गोमंतकीयांचे' भवितव्य धूसर..! मुख्यमंत्र्यांनी मुद्द्यावर ठेवले बोट; 'काय बिघडलंय गोव्यात' नक्की वाचा

Goa Live Updates: फोटो पत्रकार संतोष मिरजकर मारहाणप्रकरणी दक्षिण गोवा पोलिसांना 7 दिवसांचा अल्टिमेटम!

SCROLL FOR NEXT