PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व-

10 लाख तरुणांना सरकारी नोकरी देण्याचा PM मोदींचा 'मास्टर प्लॅन', 51 हजार जणांना आज दिले जॉईनिंग लेटर

Government Jobs: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 10 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

Manish Jadhav

PM Modi Master Plan To Distribute Government Jobs: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 10 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. या योजनेतर्गंत आज 10 व्या रोजगार मेळाव्यात 51 हजार लोकांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.

यासाठी देशभरात 37 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला होता. नव्याने भरती झालेल्या तरुणांची केंद्र सरकार तसेच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियुक्ती केली जाईल.

नव्याने भरती झालेले कर्मचारी रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण विभाग, साक्षरता विभाग आणि इतर मंत्रालयांमध्ये काम करतील.

कर्मयोगी पोर्टलद्वारे ऑनलाइन प्रशिक्षण उपलब्ध होईल

मोदी सरकारची ही योजना सुरु करण्याचा उद्देश तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करुन देणे आणि त्यांना राष्ट्रीय विकासात भागीदार बनवणे हा आहे.

नियुक्त करण्यात येणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना IGOT कर्मयोगी पोर्टलवर ऑनलाइन मॉड्यूलद्वारे प्रशिक्षण देण्याची संधी मिळेल. 750 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले आहेत. नव्याने नियुक्त केलेले कर्मचारी (Employees) कोठूनही आणि कोणत्याही डिव्हाइसवरुन कनेक्ट होऊ शकतात.

खरेतर, जून 2022 मध्ये पंतप्रधानांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 10 लाख लोकांना मिशन मोडमध्ये सरकारी नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्या जातील अशी घोषणा केली होती. जून 2022 मध्ये पंतप्रधानांनी स्वतः सर्व सरकारी मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांचा आढावा घेतला, त्यानंतर भरतीचा निर्णय घेण्यात आला.

11 महिन्यांत 5 लाख लोकांना रोजगार मिळाला

दरम्यान, 22 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा सुरु केला होता. गेल्या 10 महिन्यांत 9 रोजगार मेळ्यांमध्ये सुमारे 5 लाख तरुणांना जॉईनिंग लेटर देण्यात आले आहेत.

28 सप्टेंबर रोजी 9व्या रोजगार मेळाव्यातर्गंत 51 हजार युवकांना जॉईनिंग लेटर देण्यात आले. देशभरात 46 ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित रोजगार (Employment) मेळाव्याला पंतप्रधान मोदी उपस्थित होते.

येथून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 45 ठिकाणी युवकांना जॉईनिंग लेटरचे वाटप केले. 22 जुलै रोजी 7 व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी 70 हजारांहून अधिक तरुणांना सामील होण्याचे पत्र वितरित केले होते. देशभरातील 20 हून अधिक राज्यांमध्ये 44 ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT