Denomination successful Digitization and big increase in foreign investment Dainik gomantak
अर्थविश्व-

नोटबंदी यशस्वीच! डिजीटायजेशन, परकीय गुंतवणीकत मोठी वाढ

तीन वर्षांपूर्वी पुण्यातील अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अनिल बोकील यांनी भाजप नेत्यांसमोर नोटाबंदीचा प्रस्ताव ठेवला होता.

दैनिक गोमन्तक

8 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपासून केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोट बंद करण्याची घोषणा केली होती. तीन वर्षांपूर्वी पुण्यातील अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अनिल बोकील यांनी भाजप नेत्यांसमोर नोटाबंदीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. बोकील यांना मोदींना भेटण्यासाठी केवळ 9 मिनिटे देण्यात आली होती, मात्र नोटाबंदीचा प्रस्ताव कळल्यानंतर नरेंद्र मोदींनी त्यात रस दाखवला आणि पूर्ण 2 तास चर्चा रंगली होती.

अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अनिल बोकील हे व्यवसायाने अभियंता असून काही महिन्यांपासून मुंबईतील संरक्षण सेवेशी संबंधित होते. एका मुलाखतीत अनिल यांनी सांगितले होते की, नोटाबंदीचा विचार घेऊन ते पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचले होता. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी केवळ 9 मिनिटांचा अवधी देण्यात आला, मात्र जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा ती 2 तास चालली.

अनिल बोकील यांनी सांगितला नोटाबंदीचा फायदा

अर्थक्रांती संस्थेच्या वतीने अनिल बोकील यांनी नोटाबंदीचे फायदे सांगितले. ते म्हणाले की, नोटाबंदी लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमती कमी झाल्या. याशिवाय मालाची मागणी वाढली, त्यामुळे उत्पादन वाढवावे लागले. उत्पादनासाठी लोकांची आवश्यकता भासली. म्हणजे रोजगार वाढला. एवढेच नव्हे तर बँकांकडून सुलभ आणि स्वस्त कर्ज उपलब्ध झाले. याशिवाय जमीन आणि मालमत्तेच्या किंमत कमी झाल्या.

नोटाबंदीने दहशतवाद-नक्षलवादावर काय फरक पडला?

एका मीडिया संस्थेने अनिल यांना विचारले की नोटाबंदीमुळे दहशतवाद आणि नक्षलवादावर काय फरक पडला. प्रत्युत्तरात अनिल म्हणाले की, नोटाबंदीनंतर नक्षलवाद आणि दहशतवादाला आळा बसला आहे. पूर्वी त्यांना सहज निधी मिळत असे. पण आता तसे होत नाही. काश्मीरमध्ये त्याचा मोठा परिणाम दिसून आला आहे.

नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला आळा बसला का?

नोटाबंदीचा काळ्या पैशावर काय परिणाम झाला या प्रश्नाला उत्तर देताना अनिल म्हणाले, "नोटाबंदीनंतर व्यवहारात पारदर्शकता वाढली आहे. लोकांना ट्रॅक करणे सोपे झाले. पांढर्‍या पैशाचे चलन वाढले आहे. बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध झाले आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर डिजिटायझेशनमुळे महाराष्ट्र दिवसेंदिवस डेव्हलप होत आहे. बेनामी मालमत्ता जप्त केल्या जात आहेत.

नोटाबंदीची कल्पना देणारे अनिल बोकील कोण आहेत?

अनिल बोकील हे व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनीअर असून पुण्यातील अर्थक्रांती या थिंक टँकचे संस्थापक आहेत. ते मूळचे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे आहे. 1999 मध्ये त्यांनी अर्थक्रांती साठी काम करायला सुरुवात केली आणि 2004 मध्ये अर्थक्रांती ही संस्था उदयास आली. बोकील हे अनेक सामाजिक आर्थिक प्रकल्पांमध्ये गुंतलेले असतात. जसे टिनी इंडस्ट्रीज कॉप इंडस्ट्रियल इस्टेट. बोकील यांनी सुरू केलेला हा 75वा लघु उद्योजकांचा समूह आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT