Stock Market Danik Gomantak
अर्थविश्व-

Stock Market: शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्राय डे’

अदानी समूहाच्या शेअरवर प्रतिकूल मत व्यक्त केल्याचे पडसाद कालही शेअर बाजारात उमटून सेन्सेक्स व निफ्टी सुमारे दीड टक्का कोसळले.

दैनिक गोमन्तक

Stock Market: हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमध्ये अदानी समूहाच्या शेअरवर प्रतिकूल मत व्यक्त केल्याचे पडसाद कालही शेअर बाजारात उमटून सेन्सेक्स व निफ्टी सुमारे दीड टक्का कोसळले. अदानी समूहाचे प्रमुख शेअरही वीस टक्क्यांपर्यंत कोलमडले.

त्याचबरोबर अदानी समूहाला कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांच्या शेअरमध्येही पडझड झाली. अदानी एंटरप्राईजच्या एफपीओलाही आज अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला.

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे शुक्रवारीही अदानी समूहाचे शेअर मोठ्या प्रमाणावर पडले होते. कालही अदानी पॉवर आणि अदानी विल्मर या कंपन्यांचे शेअर पाच टक्के कोसळले.

मात्र त्याखेरीज अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅस या शेअरचे भाव तब्बल वीस टक्के कोलमडले आहेत.

जोरदार घसरण

खासगी तसेच सरकारी बँकांनी बँकांचे तिमाही निकाल चांगले लागल्यामुळे बँक शेअरमध्ये मोठी तेजी आली होती. मात्र अदानी समूहाच्या शेअरच्या गोंधळामुळे आता बँकांच्या शेअरमध्येही पडझड सुरू झाली आहे.

स्टेट बँक, एलआयसी आणि बँक ऑफ बडोदा यांच्या शेअरबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण झाले. मात्र त्याचा फटका सर्वच बँकांना बसला आणि त्यांच्या शेअरमध्ये नफा वसुली झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT