Battlegrounds Mobile India  Dainik Gomantak
अर्थविश्व-

Battlegrounds Mobile India गेमचा लवकरच iPhone वर घेता येणार आनंद

Battlegrounds Mobile India (BGMI) ने लॉन्च झाल्याच्या एका आठवड्यात एक जबरदस्त रेकॉर्ड तयार केला आणि 34 दशलक्षाहून अधिक लोकांनी त्यासाठी नोंदणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Battlegrounds Mobile India (BGMI) ने लॉन्च झाल्याच्या एका आठवड्यात एक जबरदस्त रेकॉर्ड तयार केला आणि 34 दशलक्षाहून अधिक लोकांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. अँड्रॉइड स्मार्टफोनवर (Android smartphone) आपली छाप निर्माण केल्यानंतर आता हा लोकप्रिय गेम अ‍ॅपल IOS प्लॅटफॉर्मवर (iPhone) लवकरच सादर होणार आहे. कंपनीच्या एका कार्यकारी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. (Battlegrounds Mobile India game will soon be able to enjoy on iPhone)

दक्षिण कोरियन गेमिंग कंपनी क्राफ्टनमधील बॅटलग्राउंड्स मोबाइल विभागाचे अध्यक्ष वुयोल लिम यांनी माहिती दिली आहे की, डेवलपर्स BGMI ला IOS वर आणण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. आम्ही लवकरच आमच्या सोशल मीडियावर याबद्दल माहिती देऊ जेणेकरून या गेमचे चाहते अपडेट राहतील.

BGMI चे दररोज 16 दशलक्ष अ‍ॅक्टिव युजर्स आहे

गेल्या वर्षी PUBG वर बंदी घातल्यानंतर BGMI विशेषतः भारतासाठी सादर करण्यात आली आहे आणि भारतात आतापर्यंत 16 दशलक्ष अॅक्टिव युजर्स आणि 2.4 दशलक्ष पीक कॉन्करेंट यूजर्स आहेत. लिम म्हणाले की, बीजीएमआय भारताच्या चाहत्यांसाठी तयार केले गेले आहे आणि कंपनी चाहत्यांना आणि खेळाडूंना उत्तम गेमिंग अनुभव देण्यासाठी सतत काम करत आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जास्तीत जास्त एंगेजिंग कंटेंट, वर्ल्ड-क्लास कोलैबोरेशंस आणि भारतासाठी स्पेसिफिक कंटेंट आणणे आहे.

खेळाडूंच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे.

बॅटलग्राउंड गेममध्ये रिमाइंडर फीचर देखील देण्यात आले आहे, जे खेळाडूंना दीर्घकाळ गेम खेळल्यानंतर ब्रेक घेण्यासाठी नोटिफिकेसन देते. जरी ही वैशिष्ट्ये अनेक वापरकर्त्यांसाठी त्रासदायक असू शकतात तरी प्लेयर्सच्या आरोग्याचा यामध्ये पुर्णपणे विचार केला आहे. सुरक्षित गेमप्लेचा अनुभव देणे ही कंपनीसाठी सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. संपुर्ण टीमने चाहत्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन गेम तयार केलाय. गेममध्ये सल्लागारही ठेवले आहेत. या गेममधीन बैटलग्राउंड हे एक आभासी जग आहे, त्यामुळे गेमिंगसाठी काही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पालकांना OTP कंट्रोल दिलाय, असे लिम यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

Goa Assembly Election 2027: वेळ अजूनही गेलेली नाही! 2012चा इतिहास पुन्हा घडणार? गोव्यात बदलाची हवा वाहण्यासाठी विरोधकांची एकजूट हवीच

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

SCROLL FOR NEXT