Zain Nadella Twitter
अर्थविश्व

मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे CEO सत्या नडेला यांच्या 26 वर्षीय मुलाचे निधन

झैन नडेला 26 वर्षांचे होते.

दैनिक गोमन्तक

मायक्रोसॉफ्टचे (Microsoft CEO) सीइओ सत्या नडेला (Satya Nadella) यांचा मुलगा झैन नडेला (Zain Nadella) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. सॉफ्टवेअर निर्मात्याने आपल्या अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे ही माहिती दिली. सत्य नडेला आणि त्यांची पत्नी अनु यांचा मुलगा झैन नडेला याने 26 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. झैन नडेला जन्मता: चा सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) या आजाराने ग्रस्त होता.

सत्या नडेला यांनी 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टच्या सीइओ पदाचा कारभार हाती घेतला. नडेला यांनी त्यानंतर दिव्यांग वापरकर्त्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी साधने डिझाईन करण्यावर अधिक भर दिला. मुलगा झेनचे संगोपन करण्यासाठी त्यांनी शिकलेल्या धड्यांचा उल्लेख केला आहे. गेल्या वर्षी Children’s Hospital मध्ये झेनचे उपचार झाले. नंतर Seattle Children’s Center for Integrative Brain Research मदतीने नडेला यांनी Pediatric Neurosciences मध्ये झेन नडेला एंडॉव्ड चेअर बनवली होती. सत्या नडेला यांना यंदा 'पद्म भूषण' पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.

सेरेब्रल पाल्सी (cerebral palsy) हा आजार लहान मुलांमध्ये जन्मत: च आढळून येतो. या आजारामध्ये स्नायू कमजोर असतात. यामुळे शारीरिक हालचाल देखील करता येत नाही. जगात दरवर्षी सुमारे 30, 000 मुलांमागे 3 मुले या आजाराने ग्रस्त आहेत. या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी 6 ऑक्टोबर हा दिवस जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT