Work From Home बंद होणार का? काय आहे कंपन्यांची तयारी

 

Dainik Gomantak 

अर्थविश्व

Work From Home बंद होणार का? काय आहे कंपन्यांचा निर्णय

आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या ऑफिसमध्ये (Office) परतण्याची तयारी सुरू केली असून यासाठी कॅब, कार्यालयीन जागा आणि इतर सुविधा देणाऱ्या लोकांशी संपर्क साधला आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना काळात अनेक कंपन्याकडून वर्क फ्रॉम होमची (Work From Home) म्हणजे घरून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. अजूनही अनेक लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. पण आता वर्क फ्रॉम होम लवकरच बंद होऊ शकते. अनेक आयटी कंपन्या (IT Companies) लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांना हळूहळू कार्यालयात बोलावण्याच्या तयारीत आहेत. एका अहवालानुसार जर कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेची चिंता नसेल तर 6 महिन्यामध्ये आयटी कंपन्याच्या (IT Companies) 50 टक्के कर्मचाऱ्यांना (Employees) कार्यालयात बोलावले जाईल.

महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सांगतात की, वर्क फ्रॉम होम आपल्या जीवनातील एक महत्वाचा भाग बनला आहे. त्यांनी सांगितले आहे की वर्क फ्रॉम होमचे कल्चर (Culture) कायम राहणार. कोरोना (Corona) संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची सुविधा मिळणार आहे. खर म्हणजे कर्मचाऱ्याना ऑफिसमध्ये (Office) बोलावण्याची तयारी केवळ कंपन्यांच करत नाहीत तर वर्क फ्रॉम होम करणारे अनेक कर्मचारीसुद्धा ऑफिसमध्ये येऊन काम करण्याच्या तयारीत आहेत.पण यासाठी मास्क लावणे (Mask) , लसीकरण आवश्यक यासारख्या नियमांची (Rules) अट घातली आहे.

* वर्ड इकॉनॉमिक फोरमने सर्वेक्षण केले

वर्ड इकॉनॉमिक फोरमने नुकतेच भारतासह 33 देशांतील अशा कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे जी वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यापैकी 78 टक्के कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील आपल्या सहकाऱ्यांच्या लसीकरणांचा आग्रह धरला आहे.

तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले नसेल तर त्यांची वेळोवेळी चाचणी करावी आणि 81 टक्के लोकांनी मास्क घालण्याचा आग्रह धरला आहे. सर्वेक्षणानुसार भारतातील 90 टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरण (Vaccination) केले नसेल तर त्यांची वेळोवेळी चचणी करावी आणि 81 टक्के मास्क लावण्यावर बंधन आणले आहे. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिल्याने अनेक कंपण्याचा खर्च कमी झाला आणि नफा वाढला हे लक्षात घेण्यासारखे असले तरी अनेक कंपन्याचे कर्मचारी घरीच राहून इतर कंपन्यासाठी काम करत असल्याचे समोर आले आहे. तर काहीनी फ्री लान्सचे काम हाती घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

LPG Crisis: क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी! आयपीएल 2026 वर गॅस संकटाचं सावट; बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय?

Volkswagen Layoffs: ऑटोमोबाईल विश्वात मोठा भूकंप! 'फोक्सवॅगन' 50000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; पोर्शे अन् ऑडी सारख्या ब्रँड्सनाही फटका

Dhurandhar 2: रिलीजपूर्वीच ‘धुरंधर ’चा धमाका! विक्रमी ऍडव्हान्स बुकिंग; सगळे रेकॉर्ड तुटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT