Big Bull  Dainik Gomantak
अर्थविश्व

Big Bull झुनझुनवाला यांच्या नंतर कोण सांभाळणार त्यांच सम्राज्य, कोण आहेत वारसदार

गोमन्तक डिजिटल टीम

भारतातील बिग बुल (Big Bull) अशी ओळख कमावलेले ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे आज (रविवारी) आकस्मिक निधन झाले. झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान, अर्थमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह उद्योगपतींनी शोक व्यक्त केला. झुनझुनवाला 40 हजार कोटींहून अधिक संपत्ती मागे सोडून गेले आहेत. तसेच, नुकतेच सुरू झालेल्या अकास एअरलाईन्समध्ये देखील त्याची भागीदारी आहे. त्यांनी उभारलेल्या या साम्राज्य कोण सांभाळणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.

राकेश झुनझुनवाला यांची 'रेअर एंटरप्रायझेस' नावाची कंपनी आहे. हीच कंपनी बिग बुलच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करते. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीची अकासा एअरमध्ये एकूण 40 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. झुनझुनवाला हे स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्सचे प्रमोटर होते. जून तिमाहीत त्यांची हिस्सेदारी 17.5 टक्क्यांच्या जवळ होती. राकेश झुनझुनवाला यांचे साम्राज्य सांभाळण्याची जबाबदारी आता पत्नीवर आली आहे. रेखा झुनझुनवाला आणि त्यांचा मुलगा राकेश झुनझुनवाला यांचे रेअर एंटरप्रायझेस संभाळू शकतात.

राकेश झुनझुनवाला यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्ठा झुनझुनवाला, मुलगा आर्यमन आणि आर्यवीर झुनझुनवाला असा परिवार आहे.

दरम्यान, राकेश झुनझुनवाला यांच्या निधनामुळे अकासा एअरलाइन्स आणि अन्य व्यवसायांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. एका इव्हेंटमध्ये बिग बुल झुनझुनवाला यांनी त्यांचे वडील हे त्यांचे पहिले रोल मॉडेल आहेत. याशिवाय टाटा समूह, गुंतवणूकदार आणि डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनाही झुनझुनवाला आपला आदर्श मानत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT