Whatsapp Tips Dainik Goomantak
अर्थविश्व

WhatsApp चे हे नवे फिचर्स तुमच्यासाठी, आता करता येणार फोटो अन् व्हिडिओ एडिट

WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फिचर लॉंच केले आहे.

दैनिक गोमन्तक

WhatsApp New Features: व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी नवनवे फिचर लॉंच करत असते. Android बीटावरील काही बीटा परीक्षकांसाठी WhatsApp नवे फिचर लॉंच करणार आहे. एका नवीन अहवालानुसार, बीटा टेस्टर आता टेक्स्ट एडिटरमध्ये फोटो, व्हिडिओ आणि GIF एडिट करू शकणार आहे.

अहवालात मिळालेल्या माहितीनुसार

WABetaInfo नुसार युजर्स कीबोर्डच्या वर दिसणार्‍या फॉन्ट पर्यायांपैकी एकावर टॅप करून विविध फॉन्टमध्ये सहजपणे स्विच करण्यास करु शकणार आहे. टेक्स्ट अलाइनमेंट डावीकडे, मध्यभागी किंवा उजवीकडे देखील बदलले जाऊ शकते. युजर्ससाठी हे खुप फायदेशीर ठरणार आहे. यामुळे त्यांना व्हिडिओ आणि GIF सह काय करतात यावर अधिक कंट्रोल ठेवता याणार आहे.

हे कस काम करत

बीटा युजर्स टेक्स्टचे बॅकग्राउंड रंग बदलू शकतात. ज्यामुळे त्यांना आवश्यक असलेला मजकूर इतरांपेक्षा वेगळे करणे सोपे होईल. कॅलिस्टोगा, कुरियर प्राइम, डॅमियन, एक्सो 2 आणि मॉर्निंग ब्रीझ यासह बीटा टेस्टरसाठी काही नवीन फॉन्ट देखील जारी करण्यात आले आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात अशी नोंद करण्यात आली होती की मॅसेजिंग प्लॅटफॉर्म 'ऑडिओ चॅट्स' नावाच्या एका नवीन वैशिष्ट्यावर काम करत आहे, जे Android वर अनुप्रयोगाच्या भविष्यातील अपडेटमध्ये संभाषणांमध्ये उपलब्ध असेल. नवे एडिटर बीटा टेस्टिंगचा एक भाग आहे. याचा अर्थ तो आत्तापर्यंत सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार नाही. व्हॉट्सअॅपने हे फीचर केव्हा लॉंच करणार याबाबत अद्याप माहिती दिली नाही.

या वैशिष्ट्यांवर काम सुरु

WhatsApp एकाच वेळी इतर अनेक फिचर्सवर देखील काम करत आहे. हे सध्या फक्त बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहेत. चॅट अॅप एडिट फीचरवर देखील काम करत आहे. जे युजर्सला मॅसेज पाठवल्यानंतर एडिट करता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT