Whatsapp New Update For Group Dainik Gomantak
अर्थविश्व

Whatsapp New Update : व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये आता तब्बल 1024 जण होऊ शकणार सामील; नवे फीचर घ्या जाणून

Whatsapp New Update For Group : आता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सअॅप आता ग्रुपमधील सदस्यांची मर्यादा वाढवणार आहे.

दैनिक गोमन्तक

Whatsapp New Update For Group : मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना नवीन वैशिष्ट्ये देण्यासाठी सतत विविध बदल करत आहे. आता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सअॅप आता ग्रुपमधील सदस्यांची मर्यादा वाढवणार आहे. या अपडेटनंतर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तब्बल 1024 सदस्य जोडता येतील.

या वर्षी मे महिन्यात व्हॉट्सअॅपमधील ग्रुप सदस्यांची संख्या बदलताना 256 सदस्यांवरून 512 सदस्य करण्यात आली होती. आता व्हॉट्सअॅप हा आकडाही दुप्पट करण्याचा विचार करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने सध्या हे फीचर बीटा टेस्टर्सपुरते मर्यादित केले आहे. लवकरच हे फीचर इतर युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे . असा दावाही केला जात आहे की व्हॉट्सअॅप 2GB पर्यंतच्या फाइल्स शेअर करण्यासाठी अपडेट जारी करणार आहे.

whatsapp प्रीमियम

व्हॉट्सअॅपने बिझनेस अॅपच्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅप प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील सुरू केले आहे. व्हॉट्सअॅप प्रीमियमचे अपडेट बीटा वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे. बीटा वापरकर्ते त्यांच्या अॅपमध्ये प्रीमियम मेनू पाहू शकतात. वापरकर्त्यांना प्रीमियम मेनूमध्ये अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT