Ashwini Vaishnav Dainik Gomantak
अर्थविश्व

Ashwini Vaishnaw यांचा मोठा निर्णय, 'या' टेलिकॉम कंपनीला मोदी सरकारचा आधार!

Ashwini Vaishnaw: दीर्घकाळापासून कर्जबाजारी असलेल्या वोडाफोन आयडियाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अश्विनी वैष्णव यांनी एक विशेष योजना आखली आहे.

दैनिक गोमन्तक

Vodafone Idea: दीर्घकाळापासून कर्जबाजारी असलेल्या वोडाफोन आयडियाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अश्विनी वैष्णव यांनी एक विशेष योजना आखली आहे. कंपनीला भांडवलासोबतच इक्विटीचीही गरज असल्याचे सरकारचे मत आहे, ज्याच्या पूर्ततेसाठी चर्चा सुरु आहे. सध्या या कंपनीतील इक्विटी खरेदी करण्यासाठी सरकारला बराच कालावधी लागू शकतो. व्होडाफोन आयडिया (Vi) सध्या 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जात बुडलेली आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

आज माहिती देताना अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी सांगितले की, "व्होडाफोन आयडियाच्या अनेक गरजा आहेत, परंतु त्यापैकी बहुतांश भांडवलाची गरज आहे... सध्या कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किती भांडवल द्यावे लागणार? असे अनेक प्रश्न आहेत. समस्यांवर चर्चा सुरु असून लवकरच तोडगा निघेल.''

प्रवर्तकांचे स्टेक कमी झाले

कंपनीने सरकारला देय असलेल्या सुमारे 16,130 कोटी रुपयांच्या व्याज दायित्वांचे इक्विटीमध्ये रुपांतर करण्याचा पर्याय निवडला आहे. ही कंपनीतील सुमारे 33 टक्के हिस्सेदारी असेल. याशिवाय, कंपनीतील प्रवर्तकांची हिस्सेदारी 74.99 टक्क्यांवरुन 50 टक्क्यांवर आली आहे.

यावेळी इक्विटीमध्ये रुपांतरित करणे कठीण आहे

अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, Vodafone Idea – Vodafone Plc आणि आदित्य बिर्ला ग्रुपचे प्रवर्तक सध्याच्या परिस्थितीचा विचार करुन टेलिकॉम कंपनीमध्ये पुरेशी गुतंवणूक करण्यास तयार नाहीत. या कारणास्तव, AGR वर मिळणाऱ्या व्याजाचे इक्विटीमध्ये रुपांतर करणे कंपनीसाठी कठीण काम आहे.

मागणी काय?

वैष्णव पुढे म्हणाले की, 'दूरसंचार सेवा देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर एकसमान सेवा आणि समान नियमांची मागणी आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) देखील OTT प्लॅटफॉर्मसह समानतेच्या मागणीवर काम करत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT