Money laundering news, Vijay Mallya & Nirav Modi & Mehul Choksi News, Vijay Mallya News, Nirav Modi News,  Dainik Gomantak
अर्थविश्व

विजय मल्ल्या, नीरव मोदी अन् मेहुल चोक्सी यांची 19,111 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे (Banks) एकूण 22585.83 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमन्तक

बँक कर्जाची परतफेड न करता परदेशात पळून गेलेले व्यापारी विजय मल्ल्या (Vijay Mallya), नीरव मोदी (Nirav Modi) आणि मेहुल चोक्सी (Mehul Choksi) यांची 19,111.20 कोटी रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आल्याचे सरकारने मंगळवारी सांगितले. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी सांगितले की, या तिन्ही व्यावसायिकांनी त्यांच्या कंपन्यांच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून चुकीच्या पद्धतीने पैसे काढून फसवणूक केली आहे. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकूण 22585.83 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (Vijay Mallya Nirav Modi and Mehul Choksi have assets worth Rs 19111 crore seized)

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत मालमत्ता जप्त केल्या

ते म्हणाले की, '15 मार्च 2022 पर्यंत, यापैकी 19111.20 रुपयांची मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आली आहे. यापैकी 15,113.91 कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परतही करण्यात आली आहे. यासोबतच 335.06 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करुन भारत सरकारला देण्यात आली आहे.' (Money laundering case news)

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, ''15 मार्च 2022 पर्यंत, या प्रकरणांमध्ये फसवणूक करुन काढण्यात आलेल्या निधीपैकी 84.61 टक्के रक्कम जप्त करण्यात आली आहे. बँकांच्या एकूण तोट्यापैकी 66.91 टक्के रक्कम बँकांना परत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाने अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याकडे सोपवलेल्या मालमत्तेची विक्री करुन 7975.27 कोटी रुपये वसूल केले आहेत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT