UPI Transactions Record 2026: भारताच्या डिजिटल पेमेंटचा डंका जगभर वाजत असून, दिवाळीच्या काळात यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांनी आतापर्यंतचे सर्व जुने रेकॉर्ड मोडले. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2026 मध्ये यूपीआय व्यवहारांचे मूल्य पहिल्यांदाच 31.53 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचले.
यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच दैनंदिन सरासरी यूपीआय व्यवहार 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊन 1.01 लाख कोटींवर पोहोचले. सणासुदीच्या या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 15.6 टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवली गेली. केवळ ऑक्टोबरच नव्हे, तर नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या चार दिवसांतच हा आकडा वाढून 1.29 लाख कोटी रुपयांवर गेला असून, दिपोत्सव आणि गिफ्टिंगमुळे नोव्हेंबरमध्ये आणखी नवे विक्रम प्रस्थापित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
याु अभूतपूर्व वाढीमागे नागरिकांचे बदललेले आर्थिक व्यवहार आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा बळकट पाया हे मुख्य कारण मानले जात आहे. आता यूपीआय हे केवळ मोठ्या शहरांपुरते किंवा मोठ्या मॉलपुरती मर्यादित राहिलेली नसून गल्लीबोळातील किरकोळ दुकाने, भाजी विक्रेते आणि छोट्या व्यावसायिकांपासून ते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सपर्यंत सर्वत्र सर्रास वापरले जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल, दागिन्यांची खरेदी असो वा दैनंदिन प्रवासाचा खर्च, लोकांनी रोकड बाळगण्यापेक्षा डिजिटल माध्यमांना प्राधान्य दिले. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, हा बदल केवळ वाढत्या खपाचा नसून लोकांच्या रोजच्या सवयींमध्ये आलेले डिजिटायझेशन दर्शवतो, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक वेगाने प्रगतीपथावर अग्रेसर होत असून येत्या काळात कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार यात शंका नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.