PM Free Sewing Machine Scheme 2022, PM Free Silai Machine Yojana 2022, Sewing Machine scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Scheme 2022: 'या' योजने अंतर्गत महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन

देशातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात यासाठी सरकारने प्रत्येक राज्यातील 50 हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील महिलांना जास्तीचे पैसे कमावता यावेत आणि त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे यासाठी सरकारने प्रत्येक राज्यातील 50 हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन (Sewing Machine) देण्याची योजना सुरू केली. (PM Free Silai Machine Yojana 2022)

भारतीय महिलांना स्वतंत्र म्हणजेच आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पीएम फ्री सिलाई मशीन योजनेअंतर्गत 20 ते 40 वयोगटातील प्रत्येक महिला या मशीनसाठी अर्ज करू शकते. ही योजना ग्रामीण तसेच शहरी महिलांसाठी पुर्णपणे वैध आहे.

पीएम फ्री शिलाई मशीन योजना 2022: पात्रता आणि त्यासाठीची महत्त्वाची कागदपत्रे खालील प्रमाणे, योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे:

आधार कार्ड

जन्मतारीख पुरावा

उत्पन्नाचा दाखला

अद्वितीय अपंगत्व आयडी (अपंगांसाठी)

विधवा प्रमाणपत्र (विधवांसाठी)

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

मोफत शिलाई योजनेसाठी अर्ज कसा करावा?

मोफत शिलाई मशीन योजनेच्या या अधिकृत वेबसाइटला भेट द्या म्हणजे www.india.gov.in. वेबसाईटच्या पहिल्याच मुखपृष्ठावरच्या पर्यायावर क्लिक करा “शिलाई मशीन मोफत पुरवण्यासाठी अर्ज प्रपत्र” या लिंक वरती क्लीक करा. अॅप्लिकेशन फॉर्म पेज स्क्रीनवर PDF फॉरमॅटमध्ये दिसेल आणि त्याची प्रिंटआउट तुम्ही तुमच्या कडे घ्या. आता सर्व आवश्यक तपशील त्यामध्ये भरून टाका (नाव, वडील/पतीचे नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती यासारख्या सर्व तपशीलांचा उल्लेख त्यामध्ये करा). सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जासोबत फोटोकॉपी जोडून तुमची सर्व कागदपत्रे संबंधित कार्यालयात द्यावी लागतील. यानंतर, तुमचा अर्ज ऑफिसरद्वारे तपासला जाईल, तपासणी केल्यानंतर तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Prime Minister Dance: दमादम मस्त कलंदर... शिबानी कश्यपच्या गाण्यावर पंतप्रधानांचा भन्नाट डान्स, रंगली अविस्मरणीय मैफल Watch Video

Shefali Jariwala: तू नेहमी माझ्या हृदयात... शेफालीच्या मृत्यूनंतर पती दुःखातून सावरेना, बघा काय केलं? Watch Video

Nachinola House Fire: नास्नोळा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, 5 लाखांचे नुकसान

'माझे घर' योजनेचा लाभ घ्या; मुख्यमंत्री सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन, 1972 पूर्वीची घरे नियमित होणार

Amba Ghat Landslide: कोकणात मुसळधार पावसाचा तडाखा, आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT