Post Office Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office Scheme: मुलींसाठी सरकारची खास योजना, 250 रुपये जमा करुन मिळवा लाखोंचा फायदा

Sukanya Samriddhi Yojana Calculator: शासनाकडून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

दैनिक गोमन्तक

Sukanya Samriddhi Yojana Calculator: शासनाकडून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये सरकार लोकांना आर्थिक मदत करते, तर अनेक बचत योजनाही लोकांसाठी चालवल्या जात आहेत. या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करुन चांगला परतावाही मिळू शकतो. त्याचबरोबर मुलींसाठीही सरकारकडून चांगली गुंतवणूक योजना राबवली जात आहे. ही योजना दीर्घकालीन फायदेशीर ठरु शकते.

सुकन्या समृद्धी योजना

वास्तविक, आम्ही पोस्ट ऑफिसच्या (Post Office) माध्यमातून चालवल्या जाणार्‍या सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) बद्दल बोलत आहोत. ही योजना खास मुलींसाठी चालवली जाते. सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाते. पोस्ट ऑफिसमध्ये कोणीही सुकन्या समृद्धी खाते आपल्या मुलीच्या नावाने उघडू शकतो. या गुंतवणूक (Investment) योजनेवर 7.6 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. त्याचबरोबर या योजनेतून अल्पबचत करुनही लाखो रुपये कमावता येतात.

Sukanya Samriddhi Yojana Benefits

  • 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने पालकाद्वारे खाते उघडले जाऊ शकते.

  • भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही बँकेत मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते.

  • हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी (Girl) उघडता येते. परंतु, जुळ्या/तिहेरी मुलींच्या जन्माच्या बाबतीत, दोनपेक्षा जास्त खाती उघडली जाऊ शकतात.

  • एका आर्थिक वर्षात किमान प्रारंभिक ठेव रु.250 सह खाते उघडले जाऊ शकते.

  • एकरकमी किंवा 250 ते 1.50 लाख रुपयांपर्यंतचे हप्ते एका आर्थिक वर्षात खात्यात जमा केले जाऊ शकतात. जमा करावयाची रक्कम रु.50 च्या पटीत असावी.

  • खाते उघडण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 15 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यात रक्कम जमा केली जाऊ शकते.

  • एखाद्या आर्थिक वर्षात खात्यात किमान 250 रुपये जमा न केल्यास, खाते डीफॉल्ट खाते म्हणून मानले जाईल.

  • या खात्यात जमा केलेली रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कपातीसाठी पात्र आहे.

  • प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात व्याज जमा केले जाईल.

  • मिळालेले व्याज आयकर कायद्यानुसार करमुक्त आहे.

  • मुलगी वयात येईपर्यंत (म्हणजे 18 वर्षे) खाते पालकाद्वारे चालवले जाईल.

  • मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर खात्यातून पैसे काढता येतात.

  • मागील आर्थिक वर्षाच्या शेवटी उपलब्ध शिल्लक रकमेच्या 50% पर्यंत पैसे काढता येतात.

  • पैसे काढणे एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये केले जाऊ शकते.

  • याशिवाय, खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाते मॅच्यूअर होते.

  • तथापि, काही परिस्थितींमध्ये, खाते उघडल्यानंतर 5 वर्षांनी मुदतपूर्व बंद करणे देखील शक्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT