Authentication via UIDAI App Dainik Gomantak
अर्थविश्व

UIDAI ने आधार फेस ऑथेंटिकेशन सेवा अ‍ॅप केले लाँच

UIDAI ने आधार धारकाची ओळख पुष्टी करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशनचा सेवा अ‍ॅप केले लाँच केले आहे.

दैनिक गोमन्तक

12-अंकी आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हटले की, आधार धारक केंद्रीय ओळख डेटा माहितीमध्ये चेहरा ओळख वापरून त्यांची ओळख पटवू शकतात. UIDAI ने आधार धारकाची ओळख पुष्टी करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशनचा सेवा अ‍ॅप केले लाँच केले आहे. (Authentication via UIDAI App)

एकदा तुमचा चेहरा यशस्वी रित्या प्रस्थापित झाला की त्यामध्ये तुमची ओळख वेरिफाय होते. UIDAI ने अलीकडेच आधार फेस ऑथेंटिकेशन आरडी सर्व्हिस अॅप लाँच केले आहे जे आधार प्रमाणीकरण वापरकर्ता एजन्सीला (AUA) प्रमाणीकरण प्रक्रियेसाठी थेट व्यक्तीचा चेहरा कॅप्चर करण्यास अनुमती देते आहे.

या नवीन पडताळणी प्रक्रियेद्वारे, आधार धारकाची खरी ओळख प्रमाणित केली जाते आणि आधार नोंदणीच्या वेळी कॅप्चर केलेल्या UIDAI च्या डेटाबेसमध्ये रेकॉर्ड करण्यात येते. हे आधार फेस ऑथेंटिकेशन आरडी सर्व्हिस अॅप जीवनप्रमाण, पीडीएस, शिष्यवृत्ती योजना, COWIN, शेतकरी कल्याण योजना यासारख्या इतर विविध अॅप्ससाठी आधार फेस ऑथेंटिकेशनसाठी देखील वापरले जाऊ शकते.

UIDAI च्या अधिकृत ट्विटनुसार, "रहिवासी आता UIDAI RDApp डाउनलोड करून आधार फेस ऑथेंटिकेशन वापरत आहेत. "आधार फेसआरडी अॅप फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी वापरून आधार प्रमाणीकरणासाठी थेट व्यक्तीचा चेहरा कॅप्चर करते," UIDAI ने व्हिडिओ ट्विटद्वारे म्हटले. "आधार फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान UIDAI ने इनहाऊस विकसित केले आहे," असे सरकारी संस्थेने पुढे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT