Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी समूहाची मोठी डील, 'ही' कंपनी करणार 30 कोटी डॉलर्सची गुंतवणूक

Adani Green Energy: फ्रान्सची Total Energies SE अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी अदानी समूहासोबत नव्या ज्‍वाइंट वेंचरमध्ये $300 दशलक्ष गुंतवणूक करेल.

Manish Jadhav

Adani Green Energy: फ्रान्सची Total Energies SE अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी अदानी समूहासोबत नव्या ज्‍वाइंट वेंचरमध्ये $300 दशलक्ष गुंतवणूक करेल. अदानी समूहाने बुधवारी याबाबत माहिती दिली.

अदानी ग्रुपची अक्षय ऊर्जा कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लि. (AGIL) सांगितले की, 'एकूण, प्रत्यक्षपणे किंवा तिच्या उपकंपन्यांद्वारे, AGIL सह 50:50 संयुक्त उद्यम कंपनी तयार करण्यासाठी $300 दशलक्ष गुंतवणूक करेल.'

पोर्टफोलिओमध्ये सौर आणि पवन ऊर्जा दोन्ही समाविष्ट आहे

अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी थ्री लि. (AGIL23L) कडे 1,050 मेगावॅट (MWAC) आहे. यामध्ये आधीच कार्यरत असलेल्या 300 मेगावॅटचा समावेश आहे. याशिवाय, 500 मेगावॅट निर्मितीच्या टप्प्यात आहे. 250 मेगावॅट विकासाच्या टप्प्यात आहे.

पोर्टफोलिओमध्ये सौर आणि पवन ऊर्जा दोन्ही समाविष्ट आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीसाठी (Investment) हा मोठा करार आहे.

हिंडेनबर्गच्या आरोपानंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ

हिंडनबर्गच्या वतीने अदानी समूहावर सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Shares) हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती.

याचा परिणाम असा झाला की, शेअर्संनी 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी गाठली होती. मात्र, अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने सहा सदस्यीय समिती स्थापन केली होती.

दरम्यान, चौकशीनंतर या समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. या अहवालात हिंडेनबर्ग यांनी केलेल्या आरोपांमधून अदानी समूहाला क्लीन चिट देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT