Bank  Dainik Gomantak
अर्थविश्व

एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी 'या' खास सुविधा उपलब्ध

कस्टम ड्युटीच्या डिजिटल पेमेंटमुळे भारतात व्यवसाय करणे सोपे होईल.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ आईसगेट प्लॅटफॉर्मसह HDFC बँकेचे एकत्रीकरण पूर्ण झाले आहे आणि ग्राहक आता थेट बँकेमार्फत त्यांचे सीमाशुल्क भरू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार बँक (Bank) ग्राहकांना थेट एचडीएफसी बँक निवडून कस्टम ड्युटी भरण्याची परवानगी देईल. एचडीएफसी बँकेने सांगितले आहे की, ती सीमाशुल्क भरण्याची कीरकोळ आणि घाऊक दोन्ही सुविधा देत आहेत.

एचडीएफसी बँकेसह (Bank) , ग्राहकांना यापुढे इतर बँक खात्याद्वारे पेमेंट (Payment) करण्याची आवश्यकता नाही, असे निवेदनात म्हटले आहे. एचडीएफसी (HDFC) बँकेच्या ग्रुप स्टार्टअप बँकिंग (Startup Banking) , सरकारी आणि संस्थांत्मक व्यवसाय, भागीदारी आणि सर्वसामावेश बँकिंगच्या प्रमुख स्मिता भगत म्हणाल्या,"कस्टम ड्युटीच्या डिजिटल पेमेंटमुळे भारतात व्यवसाय करणे सोपे होईल." आणि कार्यक्षमता असेल.

ICICIबँक सुद्धा ही सुविधा देत आहे

खाजगी क्षेत्रातील ICICIबँक किरकोळ आणि कॉर्पोरेट ग्राहकाना कस्टम ड्युटी ऑनलाइन भरण्याची सुविधा देत आहे. आयसीआयसीआय बँकने माहिती दिली की बँकेच्या कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग (Internet Bank) आणि मोबाइल बँकिंगच्या मदतीने कॉर्पोरेट ग्राहक सहजपणे सीमाशुल्क भरू शकतात तर रिटेल ग्राहक बँकेतील रिटेल इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे पैसे भरतील.

बँकेकडून मिळलेल्या माहितीनुसार, ही सुविधा सुरू केल्यामुळेबँक ग्राहक इंडियन कस्टम्स इलेक्ट्रॉनिक गेटवेच्या वेबसाइटवरील बँकांच्या यादीमध्ये ICICIबँक निवडून ऑनलाइन सीमा शुल्क भरू शकतात. आयसीआयसीआय बँकेचे व्यवहार बँकिंग विभागाचे प्रमुख हितेश सेठिया यांनी भारतीय अप्रत्यक्ष कर आणि सेवा शुल्क मंडळाचे आभार व्यक्त करतांना म्हटले आहे की या सुविधेमुळे बँकेचे लाखों ग्राहक कस्टम्स इलेक्ट्रॉनिकच्या वेबसाईटद्वारे सीमा शुल्क भरण्यास सोपे होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT