New Rules From 1 February Dainik Gomantak
अर्थविश्व

New Rules From 1 February: 1 फेब्रुवारीपासून 'हे' नवीन नियम होणार लागू

टाटा मोटर्सच्या कार्सच्या किमतींमध्ये वाढ होणार

Akshay Nirmale

New Rules From 1 February: प्रत्येक महिन्याप्रमाणे 1 फेब्रुवारी 2023 पासूनही अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. मोदी सरकार 1 फेब्रुवारीला 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपला शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि त्यासोबतच अनेक नियमही बदलणार आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा उंचावल्या आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय अर्थसंकल्पात अपेक्षित आहेत. दरम्यान, 1 फेब्रुवारीपासून कोणते नवीन नियम तुमच्यावर परिणाम करू शकतात याविषयी जाणून घेऊया.

क्रेडिट कार्डवर शुल्क आकारणी

तुमचे बँक ऑफ बडोदामध्ये खाते असल्यास, क्रेडिट कार्डधारकांना कार्डद्वारे भाडे भरणे महागात पडू शकते. बँक ऑफ बडोदाने जाहीर केले आहे की 1 फेब्रुवारीपासून ते क्रेडिट कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या पेमेंटवर 1 टक्के शुल्क आकारले जाणार आहे.

एलपीजीच्या किमती बदलणार की नाही?

एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दर महिन्याच्या 1 तारखेला बदलते. 1 फेब्रुवारीपासून एलपीजीच्या दरात कोणताही बदल होणार नाही, अशी अपेक्षा आहे.

टाटा मोटर्सने कार्सच्या किमतींत 1.2 टक्के वाढ

1 फेब्रुवारीपासून टाटा मोटर्सच्या वाहनांच्या किमतीत वाढ होणार आहे. टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. सरासरी आधारावर, मॉडेल आणि प्रकारानुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या प्रवासी वाहनांच्या किंमती 1.2 टक्क्यांनी वाढतील.

पॅकेजिंगचे नियम बदलतील

मोदी सरकार 1 फेब्रुवारीपासून नवीन पॅकेजिंग नियम लागू करणार आहे. मैदा, बिस्किटे, दूध, पाणी, सिमेंटच्या पिशव्या, कडधान्ये अशा 19 प्रकारच्या वस्तूंच्या पॅकेजवर पॅकिंग माहिती देणे बंधनकारक असेल. यामध्ये तारीख, वजन, उत्पादन तारीख समाविष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

10 लाखांचं 800 लिटर अवैध डिझेल जप्त, 5 जणांच्या आवळल्या मुसक्या; मांडवी किनारी गोवा पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये 'गुंतवणुकीचे' आमिष दाखवून गोव्यातील एकाला 1.32 कोटींचा गंडा; केरळमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

SCROLL FOR NEXT