Money Dainik Gomantak
अर्थविश्व

सरकारच्या या छोट्या योजनांमध्ये मिळतो मोठा नफा, असा करा त्वरित अर्ज

सरकार नेहमीच लोकांच्या विकासासाठी कल्याणकारी योजना राबवते

दैनिक गोमन्तक

सरकार हे नेहमीच लोकांच्या विकासासाठी काम करते आणि म्हणूनच त्याला कल्याणकारी सरकार म्हणतात. सरकारची कल्याणकारी योजना सर्व लोकांच्या विकासासाठी कार्य करते. सरकारच्या या योजनांची तीन भागात विभागणी करता येईल. पहिली 'कोअर ऑफ कोअर स्कीम' , दुसरी 'कोअर स्कीम' आणि तिसरी 'मेजर सेंट्रल सेक्टर स्कीम ' . कोर ऑफ कोअर स्कीमच्या यादीमध्ये 6 योजनांचा समावेश करण्यात आला आहे आणि 28 योजनांचा कोर योजनांच्या यादीमध्ये समावेश आहे. (Government Post Office scheme)

पोस्ट ऑफिस स्कीम: भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. असे बरेच पर्याय आहेत जिथे परतावा खूप जास्त आहे परंतु जोखीम मोठी आहे. त्याच वेळी, असे बरेच पर्याय आहेत ज्यामध्ये परतावा कमी आहे परंतु जोखीम नाही. त्याचप्रमाणे, आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा योजनांबद्दल सांगत आहोत ज्या खूप चांगला परतावा देतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनांमध्ये कोणताही धोका नाही.

पोस्ट ऑफिस अशा अनेक योजना राबवत आहे जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. ज्यांना आपल्या गुंतवणुकीवर चांगला आणि सुरक्षित परतावा हवा आहे ते पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट (POTD), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), आणि किसान विकास पत्र (KVP) सारख्या पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांसाठी अर्ज करू शकतात. आणि त्यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra)

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनेमध्ये किसान विकास पत्र (KVP) हा देखील एक सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम रु 1000 आहे आणि कोणतीही कमाल मर्यादा नाही. यामध्ये वार्षिक 6.9 टक्के चक्रवाढ व्याजदर आहे. किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेले पैसे परिपक्वतेवर दुप्पट होतात. या योजनेत गुंतवलेली रक्कम 124 महिन्यांनंतर (10 वर्षे आणि 4 महिने) दुप्पट होते. या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील आणि तुम्हाला चांगला नफा मिळेल.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट (Post Office time deposit)

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट हि योजना एक प्रकारे बँक एफडीच्या स्वरूपात आहे. मुदत ठेव (TD) चार कालावधीसाठी उपलब्ध आहे- 1, 2, 3 आणि 5 वर्षे. यामध्ये करता येणारी किमान गुंतवणूक रु 1000 आहे आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. पाच वर्षांच्या पोस्ट ऑफिस मुदत ठेवींसाठी 6.7% व्याजदर आहे. व्याज दरवर्षी दिले जाते परंतु व्याज तिमाहीत मोजले जाते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate)

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये तुम्ही दरवर्षी किमान 100 रुपये गुंतवू शकता. या योजनेत व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. यात पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. NSC मध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. NSC प्रमाणपत्र देखील एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकते. मात्र, NSC VIII मध्ये, नोंदणीच्या तारखेपासून ते परिपक्वतेच्या तारखेपर्यंत असे फक्त एकदाच केले जाऊ शकते. यामध्ये, आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळू शकते. NSC मध्ये दर 6.8 टक्के आहे आणि व्याज वार्षिक चक्रवाढ आहे. व्याज फक्त मॅच्युरिटीवर दिले जाते. यामध्ये व्याज दिले जात नाही तर पुन्हा गुंतवणूक केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT