आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलमध्ये (Petrol diesel) प्रतिलिटर 35 पैशांनी वाढ झाली आहे. Dainik Gomantak
अर्थविश्व

पेट्रोल-डिझेल किमतीच्या वाढीला ब्रेक नाहीच

आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलमध्ये (Petrol diesel) प्रतिलिटर 35 पैशांनी वाढ झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर सामान्यांच्या खिशाल्या झळ.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांनी (IOC, HPCL आणि BPCL) देखील शनिवारी पेट्रोल डिझेलच्या (Petrol diesel) दरात पुन्हा एकदा वाढ करत ऐन दिवाळीच्या तोंडावर सामान्यांच्या खिसा रिकामा केला आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल प्रतिलिटर 35 पैशांनी महागले आहे. पेट्रोलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल 108.99 रुपये प्रतिलिटर झाले आहे. त्याचवेळी डिझेलचा विचार केला तर शनिवारी डिझेल प्रति लिटर 35 पैशांनी वाढले आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 97.72 रुपयांवर पोहोचली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 120 रुपयांच्या वर विकले जात आहे.

राजस्थानच्या श्रीगंगा नगरमध्ये आज पेट्रोल 121.25 रुपये आणि डिझेल 112.15 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 120 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT