Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोना काळात नोकरी गमावलेल्यांना 2022 पर्यंत पीएफ मिळणार

अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जे लोक EPFO मध्ये नोंदणीकृत होतील, तेच लोक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

दैनिक गोमन्तक

कोरोना महामारीच्या (Covid 19) काळात ज्यांनी नोकरी गमावली त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. महामारीच्या काळात नोकरी गमावलेल्या सर्वांच्या EPFO ​​खात्यात 2022 पर्यंत केंद्र सरकार पीएफ जमा करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सितारामन यांनी सांगितले. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जे लोक EPFO मध्ये नोंदणीकृत होतील, तेच लोक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

मनरेगाचे बजेट 1 लाख कोटी झाले

सितारामण पुढे म्हणाल्या, कोरोनामुळे रोजगारावरील संकट पाहता, मनरेगाचे यंदाचे बजेट 60 हजार कोटी रुपयांवरून एक लाख कोटी रुपये करण्यात आले आहे.

युनिट्स EPFO मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक

दरम्यान, केंद्र सरकार 2022 पर्यंत ज्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत परंतु औपचारिक क्षेत्रातील छोट्या छोट्या नोकऱ्यांमध्ये काम करण्यासाठी पुन्हा बोलावण्यात आले आहे त्यांच्यासाठी नियोक्ता तसेच कर्मचाऱ्याचा पीएफ भाग अदा करेल. ही सुविधा ईपीएफओमध्ये नोंदणी केल्यानंतरच दिली जाईल.

MSME ला उच्च स्थान मिळाले

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) अनेक दशकांपासून जे स्थान मिळाले नव्हते ते देण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या काळात मिळाले आहे, असं अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने MSMEs ला योग्य मान्यता दिली आहे. जे स्थान या क्षेत्राला मिळाले नव्हते ते मोदी सरकार देत आहे. भविष्यात ते क्षेत्र आणखी चांगली कामगिरी करेल. त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांचा विचार करता केंद्र सरकारने खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत. सरकारने MSME ची व्याख्या अत्यंत लवचिक पद्धतीने बदलली आहे. अलीकडेच संसदेत एक विधेयक आणण्यात आले आहे ज्याचा थेट फायदा MSME क्षेत्राला होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT