Old Pension Latest Update: देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रातील कर्मचारी जुन्या पेन्शनची मागणी करत आहेत.
काँग्रेसशासित हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि राजस्थानच्या सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत जुनी पेन्शन योजना बहाल केली आहे.
तेलंगणात या वर्षी निवडणुका होणार आहेत. येथे काँग्रेस पक्षाने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्याचे आश्वासन दिले आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यास तेलंगणातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (OPS) बहाल केली जाईल.
एका रॅलीला संबोधित करताना, हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या सरकारने मानवतावादी दृष्टीकोन स्वीकारुन राज्यातील 1.36 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ दिला आहे.
तसेच, येत्या काळात तेलंगणा सरकार देखील राज्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू बहाल करेल. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस (Congress) जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करते. काँग्रेस हा देशातील एकमेव असा पक्ष आहे, जो देशाची एकता आणि अखंडता एका सूत्रात बांधू शकतो.
यामध्ये निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला निम्मा पगार पेन्शन म्हणून मिळतो. जुन्या पेन्शन अंतर्गत GPF ची तरतूद आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी मिळण्याची सुविधा आहे.
दर सहा महिन्यांनी डीए वाढवला जातो. योजनेंतर्गत निवृत्ती वेतन शासनाच्या तिजोरीतून दिले जाते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना नियमानुसार पेन्शनची रक्कम मिळते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.