Sukanya Samriddhi Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

Sukanya Samriddhi Yojana : मुलगी 21 वर्षांची होताच मिळतील 65 लाख रुपये, जाणून घ्या कसे

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून कोणताही पालक आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करू शकतो.

दैनिक गोमन्तक

Sukanya Samriddhi Yojana: सरकार वेळोवेळी नागरिकांच्या सोयीसाठी अशा अनेक योजना राबवत असते, जिथे तुमचा पैसा सुरक्षित राहतो आणि तुम्हाला उत्कृष्ट परतावाही मिळतो. अशीच एक योजना केंद्र सरकारने मुलींसाठी काढली आहे. या योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना आहे.

या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतात. सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घकालीन योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करून पालक आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जमा करु शकतात. अलीकडेच सरकारने या योजनेच्या व्याजदरातही वाढ केली आहे. चालू तिमाहीसाठी सरकारने व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 8 टक्के केला आहे.

  • किती गुंतवणूक करता येईल?

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ वयाच्या 21व्या वर्षा पर्यंत घेता येतो. परंतु पालकांना सुरुवातीच्या 15 वर्षांसाठीच पैसे जमा करावे लागतील. पैसे जमा न करता खाते सहा वर्षे चालू राहते. 

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत 10 वर्षांखालील मुलींचे खाते त्यांच्या पालकांच्या नावावरच उघडले जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही वार्षिक 250 ते 1.50 लाख रुपये जमा करू शकता. 

खाते कसे उघडायचे?

या योजनेत 80C अंतर्गत केवळ दोन मुलींच्या खात्यावर कर सूट उपलब्ध होती. मात्र काही महिन्यांपूर्वी या योजनेचे नियम बदलण्यात आले असून आता एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांच्या खात्यावरही करात सूट दिली जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खाते उघडू शकता. सुकन्या समृद्धी योजना खात्यातील गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा बँकेद्वारे स्वीकारल्या जाणार्‍या इतर कोणत्याही प्रकारे जमा केली जाऊ शकते. 

ही योजना 21 वर्षात पूर्ण होते

सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षात मॅच्युर होते. पण मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर या खात्यातून शिक्षणासाठी रक्कम काढता येईल. संपूर्ण रक्कम 21 वर्षांनंतरच काढता येईल.

फेब्रुवारी 2023 पर्यंत या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 3 कोटी खाती उघडण्यात आली आहेत. 2015 मध्ये, मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली. तुम्ही या योजनेत फक्त 250 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

  • अशा प्रकारे तुम्हाला 65 लाख रुपये मिळतील

जर एखाद्या पालकाने मुलीच्या जन्मापासून दरमहा 12,500 रुपये गुंतवले तर एका वर्षात त्यांच्याकडे 1,50,000 लाख रुपये जमा होतील. अशा प्रकारे तो 15 वर्षात 22,50,000 रुपयांची गुंतवणूक करेल. आता 7.6 टक्के जुन्या दरावर नजर टाकली तर 43,43,071 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशाप्रकारे, योजना पूर्ण होईपर्यंत तो आपल्या मुलीसाठी 65,93,071 रुपये जमा करेल.

मॅच्युरिटी व्हॅल्यू
65,93,071

एकूण व्याज
43,43,071

एकूण गुंतवणूक
₹ 22,50,000

मॅच्युरिटी वर्ष
2044

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: यॉर्कर किंगचा नवा कारनामा! मलिंगाचा रेकॉर्ड मोडत बुमराह ठरला 'बोल्ड'चा बादशाह; द. आफ्रिकेविरुद्ध केली कमाल VIDEO

VIDEO: जस्सी 'जैसा' कोई नही! क्विंटन डिकॉकला केलं चारीमुंड्या चित, धाकड गोलंदाजीनं केलं क्लीन बोल्ड; व्हिडिओ व्हायरल

सत्तरीत अवकाळी पावसाचा तडाखा! अचानक कोसळलेल्या सरींनी काजू उत्पादकांचे धाबे दणाणले; उत्पादन घटण्याची भीती

T20 WC 2026: टीम इंडियासाठी 'करो या मरो'! सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण? भारताचा हा 'मास्टर प्लॅन'; पाहा संपूर्ण रोडमॅप

Holi 2026 Horoscope: होळीला ग्रहांचं महामिलन! शुक्र-शनीची युती देणार छप्परफाड धनलाभ, रखडलेली कामं होणार पूर्ण; वैवाहिक जीवनातही नांदणार सुख

SCROLL FOR NEXT