Success story of Paytm Founder Vijay Shekhar Sharma, The Biggest Beneficiary Of Demonetization. Dainik Gomantak
अर्थविश्व

संघर्षाची वाट न सोडता उभारला 98 अब्जांच्या संपत्तीचा डोंगर, गोष्ट नोटबंदीच्या सर्वात मोठ्या लाभार्थ्याची

या सर्वांमुळे एकवेळ अशी परिस्थिती आली की त्यांच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते. त्यावेळी विजय शेखर शर्मा निमित्त करून मित्रांच्या घरी जेवणासाठी जाऊ लागले. पैसे वाचवण्यासाठी ते बसऐवजी पायीच प्रवास करायचे.

Ashutosh Masgaunde

Success story of Paytm Founder Vijay Shekhar Sharma, The Biggest Beneficiary Of Demonetization:

ही गोष्ट कथा आहे भारतातील दुसरे सर्वात तरुण अब्जाधीश विजय शेखर शर्मा आणि त्यांनी स्थापन केलेल्या पेटीएम ची, ज्याने देशातील आर्थिक सेवा आणि डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती घडवली.

बँका आणि एटीएमच्या बाहेर लोकांच्या लांबलचक रांगा, नोटाबंदीमुळे उद्भवलेल्या समस्यांशी देश जुळवून घेत असताना ऑनलाइन व्यवहार हा एक उपाय बनला.

याच नोटबंदीच्या काळात पेटीएमच्या व्यवहारांमध्ये 700% वाढ झाली. त्याचा फायदा कंपनीला महसुलाच्या रुपात झाला. यामुळेच पेटीएम ला नोटबंदीचा सर्वात मोठा लाभार्थी म्हणूनही ओळखले जाते.

सरकारने या संधीचा उपयोग डिजिटल बाँडिंगला चालना देण्यासाठी केला. परिणामी प्रत्येकासाठी पेटीएम हा पर्याय बनला. पेटीएमच्या मागे असलेल्या विजय शेखर शर्मा यांची यशोगाथा.

कोण आहेत विजय शेखर शर्मा?

‘विजय शेखर शर्मा’ हे नाव साधं वाटतं पण विजय तितक्याच सामान्य कुटुंबातील होते. आज ते कोट्यवधींचा व्यवसाय करत असले तरी त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील शिक्षक होते आणि आई सामान्य गृहिणी होती.

हिंदी माध्यमाच्या शाळेत बारावीपर्यंत शिकलेले विजय किती साध्या कुटुंबातील होते, याची कल्पना येते. हिंदी माध्यमात शिकणे ही वाईट गोष्ट नसली तरी इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलाचे भवितव्य उज्वल आहे असा गैरसमज आपल्या देशातील बहुतांश लोकांमध्ये आहे.

हेच कारण आहे की अगदी सामान्यातील सामान्य व्यक्तीला सुरुवातीपासूनच आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात शिकवायचे असते. विजय सामान्य कुटुंबातून आले असले तरी त्यांची स्वप्ने नेहमीच मोठी होती. आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत कधी कमी पडू दिली नाही.

बिझनेस आयडिया

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना, विजय क्लास बंक करुन लायब्ररी आणि कॉम्प्युटर सेंटरमध्ये जास्त वेळ घालवू लागले. या काळात त्यांना खूप काही शिकायला मिळाले. विजय यांना पुस्तके आणि मासिके वाचायला आवडू लागली आणि ते त्याचा आनंद घेऊ लागले.

याच सुमारास विजय दर्यागंज मार्केटमध्ये सेकंड हँड पुस्तक घेण्यासाठी गेले होते. या काळात सिलिकॉन व्हॅलीवर काही नियतकालिकांमधून लेख प्रसिद्ध झाले. ते वाचून विजय यांनाही वाटले की भारतातही सिलिकॉन व्हॅली असावी.

1995 मध्ये जर भारतात इंटरनेट सुविधा नसती तर इंटरनेट व्यवसाय सुरू करता आला नसता. दरम्यान, कॉम्प्युटर सेंटरमध्ये बसून विजयने मार्क अँड्रीसेनची एका मासिकातील मुलाखत वाचली जिथे त्याने नेटस्केपचे बिझनेस मॉडेल स्पष्ट केले होते.

यानंतर विजय यांनी त्यांच्या काही मित्रांसोबत एक्सएस कम्युनिकेशन नावाचे सर्च इंजिन तयार केले. 1999 मध्ये विजय यांनी ते एका अमेरिकन व्यावसायिकाला विकले.

यानंतर त्यांनी येथून one97 कम्युनिकेशन सुरू केला. विजय यांनी सांगितले की त्यांनी सुरू केलेला व्यवसाय एसएमएस मॉडेलवरील इंटरनेट कन्टेटवर आधारित होता. ते दूरसंचार ऑपरेटरकडून काहीही शुल्क आकारत नव्हते परंतु त्यांनी प्रदान केलेल्या सेवांसाठी ते ग्राहकांकडून शुल्क आकारायचे.

स्ट्रगल...

विजय शेखर शर्मा यांचा पेटीएमच्या आधी सुरू केलेल्या दोन कंपन्यांचा अनुभवय खूपच संघर्षमय होता. त्यांच्या कंपन्या चांगल्या चालत होत्या. मोठ्या कंपन्या त्यांच्या ग्राहक होत्या. पण कॉमर्समधील कमकुवतपणा आणि कमी अनुभवामुळे वर्षभरातच कंपनीची स्थिती बिघडू लागली. लोकांकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली. जे काही पैसे शिल्लक होते ते भाडे आणि पगारावर खर्च होत गेले.

या सर्वांमुळे एकवेळ अशी परिस्थिती आली की जेवणासाठीही पैसे नव्हते. त्यावेळी विजय शेखर शर्मा निमित्त करून मित्रांच्या ठिकाणी जेवणासाठी जाऊ लागले. पैसे वाचवण्यासाठी ते बसऐवजी पायीच प्रवास करायचे. पुढे घरोघरी जाऊन संगणकाची छोटी-मोठी कामे करू लागले.

मात्र 2010 नंतर विजय शेखर शर्मा यांचा हा संघर्ष संपला आणि पेटीएमच्या रुपात त्यांनी भारताच्या डिजिटल पेमेंट क्षेत्रात क्रांती केली.

पेटीएमटी सुरुवात

विजय शेखर शर्मा यांना 2010 मध्ये लक्षात आले की भारतीय IT-आधारित व्यवसायांच्या वाढीवर देशात सुरू झालेल्या 3G नेटवर्कमुळे लक्षणीय परिणाम होईल. त्यांनी संधी हेरली आणि पेटीएम विकसित करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर 2011 मध्ये पेटीएम लॉन्च झाल्यानंतर 10 महिन्यांच्या आत, त्यांना 15 दशलक्ष कस्टमर वॉलेट्स सेट करण्यात यश मिळाले.

2016 मध्ये देशात नोटाबंदी झाली त्यानंतर पेटीएमच्या व्यवहारांमध्ये 700% इतकी मोठी वाढ झाली. जो ऑनलाइन पेमेंट प्रणालीसाठी एक मोठा विजय होता. यामुळे पेटीएम झटक्यात 10 अब्ज डॉलर्स मूल्यापर्यंत पोहोचू शकले.

विजय शेखर शर्मा यांच्याबद्दल थोडक्यात

  • उत्तर भारतातील एका लहान शहरातील शाळेतील शिक्षकाचा मुलगा, विजय शेखर शर्मा यांनी 2011 मध्ये वेगाने वाढणारे मोबाइल वॉलेट पेटीएमची स्थापना केली.

  • भारताच्या 2016 च्या नोटाबंदीच्या सर्वात मोठ्या लाभार्थ्यांपैकी एक, Paytm ने दररोज 400 दशलक्ष यूजर्स मिळवत 25 दशलक्ष ट्रान्झॅक्शन्स केले.

  • ऑगस्ट 2018 मध्ये वॉरेन बफेटच्या बर्कशायर हॅथवेने Paytm मध्ये 300 दशलक्ष डॉलर्स गुतवले.

  • शर्मा यांनी पेटीएम मॉल, ई-कॉमर्स व्यवसाय आणि पेटीएम पेमेंट्स बँक देखील स्थापन केली आहे.

  • नोव्हेंबर २०२१ च्या आयपीओपासून पेटीएमचे शेअर्स कमालीचे घसरले आहेत.

संपत्ती आणि पगार

फोर्ब्सच्या मते, 2022 मध्ये विजय शेखर शर्मा यांची अंदाजे एकूण संपत्ती 98 अब्ज बारा कोटी इतकी आहे. सध्या पेटीएमचे सीईओ असलेल्या विजय शेखर शर्मा यांना वर्षाला 4 कोटी रुपये पगार आहे. आणि पुढील तीन वर्षांच्या पगारात बदल होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT