Share Market Dainik Gomantak
अर्थविश्व

Share Market: आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 200, तर निफ्टी 16,300 अंकानी वधारला

Share Market Updates: आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात अस्थिरता कायम राहण्याचे संकेत आहेत.

दैनिक गोमन्तक

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 200 अंकानी वधारला तर निफ्टीमध्ये 55 अंकानी वधारला. पण, थोड्याच वेळात सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. त्यानंतर काही वेळेतच बाजार पुन्हा सावरल्याचे दिसून आले आहे. बाजारातील व्यवहाराला सुरुवात होताच टाटा स्टीलच्या शेअरमध्ये घसरण झाली तर टाटा स्टीलमध्ये 10 टक्क्यांनी घसरत लोअर सर्किट लागला आहे. (Share Market Updates News)

शेअर बाजार (Share Market) सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 41.72 अंकांनी घसरला होता. सेन्सेक्स 54,282.92 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 15 अंकाची घसरण झाली असून 16249.95 अंकावर व्यवहार करत होता.

सेन्सेक्समधील 30 पैकी 19 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी असल्याचे दिसून येत आहे. तर, 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे. बाजारात बँकिंग, ऑटो, फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर तेजीत दिसत आहे. तर, मेटल, एनर्जी, मीडिया आणि एफएमसीजी क्षेत्रात घसरण झाल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT