spicejet News  Dainik Gomantak
अर्थविश्व

स्पाइसजेट विमान भाड्यात 10 ते 15 टक्क्यांची वाढ

स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये आज 3.5 टक्क्यांहून अधिक घसरण

दैनिक गोमन्तक

जेट इंधन दरात वाढ झाल्याने स्पाइसजेटच्या विमान भाड्यात 10 ते 15 टक्यांची वाढ केली जाणार आहे. अशी माहिती स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी दिली. ते म्हणाले कि, ऑपरेटिंग कॉस्ट परवडण्याजोगी राहण्यासाठी विमान भाड्यात किमान 10 ते 15 टक्क्यांनी वाढ करणे आवश्यक आहे. त्या प्रमाणे स्पाइसजेट व्यवस्थापन हे आपला निर्णय घेईल असे ते यावेळी म्हणाले. (SpiceJet fares will increase by 10 to 15 percent)

एका बाजूला विमान भाड्यात 10 ते 15 टक्क्यांनी वाढीचे संकेत मिळाले असताना याबद्दल बोलताना स्पाईसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग म्हणाले की, स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये आज 3.5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. यामूळे बीएसईवर स्पाइसजेटचा समभाग 3.64 टक्क्यांनी घसरून 42.40 रुपयांवर आला आहे. तसेच भाडे वाढवण्याचा परिणाम कंपनीच्या शेअरवर झाला असल्याचे अजय सिंह म्हणाले.

भाडे वाढीबाबत बोलताना सिंह हे म्हणाले की, "जून 2021 पासून विमान इंधनाच्या किमतीत 120 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. किमतीतील ही प्रचंड वाढ शाश्वत नाही. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने विमान इंधनावरील कर कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. तसेच गेल्या काही महिन्यांत, आम्ही इंधनाच्या किमतीतील या वाढीचा जास्तीत जास्त भार उचलण्याचा प्रयत्न केला आहे, जो आमच्या ऑपरेटिंग खर्चाच्या 50 टक्क्यांहून अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

10 चौकार, 9 षटकार... 44 चेंडूत ठोकलं शतक! हार्दिक पांड्याचा 'हा' सहकारी खेळाडू रातोरात बनला स्टार; पदार्पण सामन्यात केला वर्ल्ड रेकॉर्ड

Panjim Fire: सेरेंडिपीटी महोत्सवाच्या सेटला लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, पणजीत टळली मोठी दुर्घटना; Watch Video

SCROLL FOR NEXT