Train  Dainik Gomantak
अर्थविश्व

शताब्दी आणि वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी असणार खास सोयी

शताब्दी आणि वंदे भारत ट्रेनमधील प्रवाशाना लवकरच प्रवासा दरम्यान रेडियोद्वारे (Radio) मनोरंजनाचा आनंद घेत येणार आहे.

दैनिक गोमन्तक

शताब्दी आणि वंदे भारत ट्रेनमधील प्रवाशाना लवकरच प्रवासा दरम्यान रेडियोद्वारे (Radio) मनोरंजनाचा आनंद घेत येणार आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मनोरंजनसाठी भारतीय रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. पॅसेंजर अॅड्रेस सिस्टिमद्वारे उत्तर रेल्वे गाड्यांमध्ये अनुकूल संगीत अनुभव आणि आरजे एंटरटेनमेंट सादर करणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस आणि शताब्दी ट्रेनमधील प्रत्येक प्रवाशाला सुखद प्रवासाचा अनुभव देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. ट्रेनमध्ये असे संगीत उपलब्ध असणे प्रवाशाना आवडेल. रेल्वेने (Railway) एका निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशासह संगीत (Music) हे सर्वोत्तम संयोजन आहे आणि प्रवास चांगला होतो.

* रेडियो संगीतांने प्रवाशांचे स्वागत

एएनआयच्या वृत्तानुसार, शताब्दी किंवा वंदे भारत या गाड्यांमध्ये प्रवासी दिल्ली, लखनौ, भोपाळ, चांदीगढ, अमृतसर, अजमेर, डेहराडून, वाराणसी, कानपूर येथे जातील तेव्हा त्यांचे स्वागत रेडियो संगीताने केले जाईल.

* 43.20 लाख रुपये वार्षिक कमाई

मनोरंजन आणि रेल्वे माहिती आणि व्यावसायिक जाहिराती दर तासाला प्रवासाच्या वेळेत 50 मिनिटे10 मिनिटे या प्रमाणात दिल्या जातील. त्यामुळे रेल्वेला (Railway) वार्षिक 43.20 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे.

* 3 वर्षात 400 नवीन रेल्वे धावणार

2022-23 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन वर्षात 400 नवीन वंदे भारत रेल्वे (Vande bharat Trains) चालवण्याची घोषणा केली होती. बॉम्बार्डियर, सिमेंस, भेल, टीटागढ़ वैगन्स यासह नऊ कंपन्यांनी 58 नवीन वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीसाठी बोली लावली आहे. सध्या भारतीय रेल्वेच्या तीन उत्पादन युनिटमध्ये मेधा इंजिनिअरिंगद्वारे अशा 44 गाड्या तयार केल्या जात आहेत.

* वंदे भारत ट्रेनमध्ये या सुविधांचा घेता येणार लाभ

या ट्रेन आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. या ट्रेनमध्ये ऑन बोर्ड वाय-फाय (Wi-Fi) , जीपीएस आधारित पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम, सुंदर सजावट, व्हॅक्यूम टॉयलेट, एलईडी लाइट, प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉइंट, दिव्यांगांसाठी व्हील चेअर यासारख्या सुविधाचा लाभ घेता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT