Share Market Dainik Gomantak
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारामध्ये दिवसाची सकारात्मक सुरुवात, सेन्सेक्स 500 अंकानी वधारला

Share Market News: मागील काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या शेअरस् नंतर आज शेअर बाजारात तेजी दिसून आली.

दैनिक गोमन्तक

शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात सकारात्मक पाहायला मिळाली आहे. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 202.34 अंकानी वधारला. आज सेन्सेक्स 52,995.96 अंकावर सुरू झाला. निफ्टी निर्देशांकात 62 अंकानी वाढ झाली. मागील काही दिवस शेअर बाजारामध्ये घसरण पाहायला मिळाली होती. (Nifty above 15,900, Sensex gains 500 pts led by auto, bank, metal, power stocks)

आशियाई शेअर बाजारात आज चांगली सुरुवात झाली. निक्केईमध्ये तेजी दिसत आहे. तर, शांघाई आणि कोस्पीमध्ये विक्रीचा दबाव आहे. त्याशिवाय, अमेरिकन (America) शेअर बाजारही 150 अंकांनी वधारला आहे. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजार वधारत बंद झाला होता.

सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 615 अंकानी वधारला असून 53,408.66 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 185 अंकानी वधारला असून 15,967.30 अंकावर व्यवहार करत आहे.

सेन्सेक्समधील 30 पैकी 23 शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसत आहे. तर 7 शेअर्समध्ये विक्री सुरू आहे. टाटा स्टीलमध्ये चांगली मागणी आहे.

टाटा स्टीलशिवाय, टायटन, मारूती, बजाज फायनान्स, एल अॅण्ड टी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एसबीआय, इंडसइंड बँक, रिलायन्स, विप्रो, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी, एनटीपीसी, टीसीएस, सन फार्मा, आयटीसी इत्यादीमध्ये जोरदार खरेदी सुरू आहे.

आज शेअर बाजारात एफएमसीजी, फार्मा, हेल्थकेअर क्षेत्रात जोरदार विक्री होत आहे. निफ्टी बँक, ऑटो, आयटी, मीडिया, मेटल, सार्वजनिक बँका, वित्तीय सेवा आदी क्षेत्रात तेजी दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT