Share Market: Sensex crossed 61000 Nifty on top  Dainik Gomantak
अर्थविश्व

दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारात 'तेजीचे सोने', सेन्सेक्स 61 हजरांवर

आज सुरुवातीलाच व्यवहारात सेन्सेक्स 422.43 अंकांनी वाढून 61,159.48 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे (Share Market)

Abhijeet Pote

जागतिक बाजारात सतत होत असल्या वाढीमुळे देशांतर्गत शेअर बाजार (Share Market) देखील सलग सहाव्या दिवशी वाढताना पाहायला मिळत आहे. आठवड्याचा शेवटच्या दिवशी शेअर बाजाराने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बीएसईचा (BSE) सेन्सेक्सने (Sensex) इतिहात प्रथमच 61000 ची पातळी ओलांडली आहे.आज सुरुवातीलाच व्यवहारात सेन्सेक्स 422.43 अंकांनी वाढून 61,159.48 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे .निफ्टीही 108 अंकांच्या वाढीसह 18,266 वर पोहोचला आहे. (Share Market: Sensex crossed 61000 Nifty on top)

आज मार्केटमध्ये आयटी शेअर्स (IT Shares) मध्ये सर्वाधिक वाढ दिसत आहे . इन्फोसिस (Infosys), एचडीएफसी बँक (HDFC Bank), एल अँड टी, एसबीआय (SBI), आयटीसी, रिलायन्स, एचडीएफसी आणि एचयूएल या कंपन्यांचे शेअर्स अधिकच वाढताना दिसले . मात्र, इंडसइंड बँक, एम अँड एम, टीसीएस, बजाज फायनान्स, एसएचएल टेक, भारती एअरटेलचे शेअर्सचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तर दुसरीकडे मोठ्या शेअर बरोबरच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स मध्येही खरेदी होताना दिसत आहे. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.90 टक्क्यांनी वधारला आहे. तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.70 टक्के इतका वाढला आहे.

बाजारातील मोठ्या कंपन्यांचा विचार करता रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅपने 17 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत, देशातील सर्वात मौल्यवान कंपनीच्या स्टॉकमध्ये या वर्षी आतापर्यंत 35.83 टक्के वाढ झाली आहे.सेन्सेक्स मागील सत्रात 452.74 अंकानी वाढून 60,737.05 वर बंद झाला होता. आज सेन्सेक्समध्ये सलग पाचवी वाढ दिसून आली आहे. तर निफ्टी 169.80 अंकांनी वाढून 18,161.75 वर बंद झाला होता . परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) बुधवारी एकूण आधारावर 937.31 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहे.

IT कंपन्यांचा विचार करता विप्रोचा निव्वळ नफा जुलै-सप्टेंबर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 17 टक्क्यांनी वाढून 2,930.6 कोटी रुपये इतका झाला आहे. यासह, कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 2,484.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.तर देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत 11.9 टक्क्यांचा एकत्रित निव्वळ नफा 5,421 कोटी रुपये नोंदवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT