Share Market on high Sensex crossed 60 thousand point Dainik Gomantak
अर्थविश्व

Share Market तेजीत सेन्सेक्स 60 हजारच्या पार

सध्या सेन्सेक्स 300 अंकांच्या वाढीसह 60584 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर निफ्टीत देखील 110 अंकांची वाढ केली आहे.

दैनिक गोमन्तक

जागतिक बाजारात सतत होत असलेल्या तेजीमुळे आज देशांतर्गत शेअर बाजारातही (Share Market) तेजी पाहायला मिळत आहे. बाजारात सतत होत असेल्या खरेदीमुळे सेन्सेक्सने (Sensex) 60,600च्या वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे निफ्टीने (Nifty) देखील 18100 चा टप्पा पार केला आहे. सध्या सेन्सेक्स 300 अंकांच्या वाढीसह 60584 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर निफ्टीत देखील 110 अंकांची वाढ केली आहे. सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजीचा कल आहे. बाजारात तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत बुधवारी 1.44 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. (Share Market on high Sensex crossed 60 thousand point)

BSE सेन्सेक्सचा विचार करता M&M ही कंपनी सर्वात जास्त तेजीत दिसत आहे,या कंपनीचा शेअर 4 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. तर दुसरीकडे पॉवरग्रीड, भारती एअरटेल, एल अँड टी, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेच शेअरच्या किंमती कमी झाल्या आहेत . तर नेस्ले इंडिया, एचयूएल, एचसीएल टेक, एसबीआय आणि टाटा स्टीलकही घसरला आहे.

गुंतवणूकदारांची संपत्तीत 5 दिवसांत 6.75 लाख कोटींनी वाढ

शेअर बाजारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलामध्ये 7,54,057.31 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये बीएसई नोंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल 7,54,057.31 कोटी रुपयांनी वाढून 2,69,74,604.36 कोटी रुपये झाले आहे.बीएसईचाच्या शेअरचा सेन्सेक्स मंगळवारी 148.53 अंकांनी वाढून 60,284.31 या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे . तर मागील चार दिवसात सेन्सेक्समध्ये 1,094.58 अंकांची वाढ झाली आहे.

2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढेल

दरम्यान IMF ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दराचा अंदाज 9.5 टक्के ठेवला आहे. तर पुढील वर्ष 2022 साठी, तसेच भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था असेल असा अंदाज IMF ने व्यक्त केला आहे. भारताचा वेगवान आर्थिक विकास दर असेल, तो 8.5 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. तर अमेरिकेतून हा दर 5.2 टक्क्यांपर्यंत राहू शकतो. अहवालानुसार, 2026-27 या आर्थिक वर्षापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 6.1 टक्के दराने वाढत राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT