Share Market on green investors earns 2.71 lakh crore rupees Dainik Gomantak
अर्थविश्व

शेअर बाजार स्थिरावला, गुंतवणूकदारांची 2.71 लाख कोटींची कमाई

शेअर बाजारातील वाढीमुळे बीएसईवर (BSE) सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 261.02 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले.

दैनिक गोमन्तक

मागील आठवडा शेअर बाजारासाठी (Share Market) तेजीचा आठवडा ठरला आहे. याआधी सलग दोन आठवडे बाजार तोट्यात होता.मात्र शेवटच्या आठवड्यात बाजारात थोडा सुधारताना दिसला. बाजारात प्रमुख निर्देशांकात सुमारे 1 टक्क्यांनी वाढ होऊन गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मागील आठवड्यात 2.71 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारातील घसरणीसह, 5 दिवसांच्या ट्रेडिंग सत्रात बाजार 2 दिवसांच्या घसरणीसह बंद झाला आहे. (Share Market on green investors earns 2.71 lakh crore rupees)

शेअर बाजारातील वाढीमुळे बीएसईवर (BSE) सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 261.02 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले. गेल्या आठवड्यातील शुक्रवारच्या व्यवसायाच्या शेवटी हा आकडा 258.31 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर होता. म्हणजेच गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांमधील गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे बाजार मूल्य 2.71 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.

त्यामुळे गेल्या आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग सत्रात कोरोनाच्या (COVID-19) नवीन व्हेरियंटच्या बाजारात भीती निर्माण झाली होती, त्यामुळे बाजार मंदावताना दिसत होता त्यामुळेच या आठवड्याची सुरुवात अत्यंत सावधपणे झाली आणि आठवड्याच्या पहिले दोन दिवस बाजार जवळपास स्थिरच राहिला होता. त्यानंतर पुढचे दोन दिवस बाजारात वाढ झाली आणि सेन्सेक्स 57064 च्या पातळीवरून 58461 च्या पातळीवर पोहोचला. मात्र, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बाजारात मोठी घसरण दिसून आली आणि सेन्सेक्स 765 अंकांच्या मोठ्या घसरणीसह 57696 च्या पातळीवर बंद झाला. आठवडाभरापूर्वी सेन्सेक्स 57064 टक्क्यांच्या पातळीवर होता.

आठवडाभरात छोट्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक कमाई दिसून आली. स्मॉलकॅप इंडेक्स 1 टक्क्यांहून अधिक वाढला.नेक्स्ट डिजिटल, एचसीएल इन्फोसिस्टम, निओजेन केमिकल्स, गुजरात फ्लोरोकेमिकल्स, मिर्झा इंटरनॅशनल 20 टक्क्यांहून अधिक वाढले.तर रिलायन्स कॅपिटल, टिडेंट, ऑरम प्रॉपटेकमध्येही मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. बीएसई मिडकॅपमध्येही एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली. सुप्रीम इंडस्ट्रीज, जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर, ऑइल इंडिया, बजाज होल्डिंग्समधील गुंतवणूकदारांनी चांगला पैसा कमावला तर दुसरीकडे ग्लेनमार्क फार्मा, बँक ऑफ इंडिया, अशोक लेलँड इत्यादी मिड-कॅप्समध्ये तोटा झाला, एनएमडीसी, एचसीएल टेक, टीसीएस इंडसइंड बँक लार्ज कॅप समभागांमध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली, तर अदानी ट्रान्समिशन आणि सिप्ला 5 टक्क्यांहून अधिक घसरताना पाहायला मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT