Share Market: Market Cap for these 7 companies from Sensex reach on 1.29 lakh crore  Dainik Gomantak
अर्थविश्व

TCS फायद्यात, 'सेन्सेक्स'च्या या कंपन्यांचे बाजारी भांडवल 1.29 लाख कोटीवर

गेल्या आठवड्यात, बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 589.31 अंकांनी वाढला आहे.

दैनिक गोमन्तक

सेन्सेक्समधील (Sensex) टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Cap) गेल्या आठवड्यात रु. 1,29,047.61 कोटींनी वाढले आहे. मार्केटमध्ये (Share Market) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) या काळात सर्वात जास्त फायदा झाला आहे . गेल्या आठवड्यात, बीएसईचा (BSE) 30 शेअर्सचा सेन्सेक्स 589.31 अंकांनी वाढला आहे. टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे बाजार भांडवल वाढताना दिसून आले. त्याच वेळी, या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलचे बाजार मूल्य घटले.(Share Market: Market Cap for these 7 companies from Sensex reach on 1.29 lakh crore)

त्याचप्रमाणे बजाज फायनान्सचे बाजार भांडवल 16,082.77 कोटी रुपयांनी वाढून 4,26,753.27 कोटी रुपये तर HDFC बँकेचे बाजार भांडवल 12,744.21 कोटी रुपयांनी वाढून 8,38,402.80 कोटी रुपये झाले.

आठवडाभरात एचडीएफसीचे बाजारमूल्य 5,393.86 कोटी रुपयांनी वाढून 5,01,562.84 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर देशाची सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे मूल्यांकन 2,409.65 कोटी रुपयांनी वाढून 4,22,312.62 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरने अहवालानुसार मागील आठवड्यात कंपनीने 1,961.91 कोटी नफा कमावला आणि कंपनीचे बाजार भांडवल आता रु. 5,50,532.73 कोटींवर पोहोचले आहे.

तर दुसरीकडे भारती एअरटेलचे बाजारमूल्य 10,489.77 कोटी रुपयांनी घसरून 3,94,519.78 कोटी रुपये झाले आहे. ICICI बँकेचे बाजारमूल्य रु. 3,686.55 कोटींनी घसरून रु. 4,97,353.36 कोटी झाले तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य रु. 2,537.34 कोटींनी घसरून रु. 15,27,572.17 कोटी रुपयांवर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT