शेअर बाजारात (stock market) आज, आठवड्याचा शेवटाला वाढीने सुरुवात झाली. Dainik Gomantak
अर्थविश्व

शेअर बाजार उघडताच आज रेकॉर्ड ब्रेक उसळी

टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टायटन, एल अँड टी, एनटीपीसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

दैनिक गोमन्तक

शेअर बाजारात (stock market) आज, आठवड्याचा शेवटाला वाढीने सुरुवात झाली. सकाळी 09:16 वाजता मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 151.79 अंकांच्या वाढीसह 54,995.77 वर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 36.10 अंकांच्या वाढीसह 16,400.50 वर उघडला. सेन्सेक्स 231.92 अंकांनी 55,075.90 वर आणि निफ्टी 72.50 अंकांनी म्हणजेच 16,436.90 वर होता.

आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांच्या विशेष आवडीमुळे देशांतर्गत शेअर बाजारांनी मोठी उसळी नोंदवली. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने गुंतवणूकदारांचे मनोबल वाढले. दिवसभराच्या व्यवसायाच्या शेवटी, बीएसईचा 30-शेअर 0.58 टक्क्यांनी वाढून 54,843.98 च्या नवीन विक्रमावर बंद झाला.

इंट्रा-डेमध्ये सेन्सेक्स 54,874.10 च्या उच्चांकावर गेला होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) चा 50-शेअर निफ्टी देखील 82.15 अंक किंवा 0.26 टक्के सुधारत 16,325.15 च्या नवीन विक्रमावर बंद झाला.

टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टायटन, एल अँड टी, एनटीपीसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. तथापि, गुंतवणूकदारांनी डॉ. रेड्डीज, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये नफा बुक केला. बीएसई वर युटिलिटीज, पॉवर, इंडस्ट्रियल, कॅपिटल गुड्स आणि आयटी ने 3.11 टक्क्यांची वाढ नोंदवली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप डंडेक्सने 1.97 टक्क्यांपर्यंत उडी घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT