Share Market
Share Market 
अर्थविश्व

Share Market Update : भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला 

दैनिक गोमन्तक

देशातील भांडवली बाजाराने आज मोठी तेजी नोंदवली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आजच्या व्यवहारात 460.37 अंशांनी वधारत 49,661.76 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज 135.55 अंकांनी वाढत 14,819.05 च्या पातळीवर स्थिरावला. त्यामुळे आठवड्याच्या तिसऱ्या सत्र व्यवहारात भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी वाढ नोंदवल्याचे पाहायला मिळाले आहे. आजच्या सत्र व्यवहारात मुबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई 49,277.09 वर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 14,716.46 च्या पातळीवर खुला झाला होता. (The Sensex and Nifty have gained ground in the capital markets)

आठवड्याच्या पहिल्या सत्र व्यवहारात शेअर बाजारातील दोन्ही निर्देशकांनी मोठी घसरण नोंदवली होती. तर दुसऱ्या व्यवहारात काल मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सक्स 42.07 अंशांच्या किरकोळ वाढीसह 49,201.39 च्या पातळीवर बंद झाला होता. यासोबतच देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील 45.70 अंकांनी वाढत 14,683.50 वर स्थिरावला होता. त्यामुळे आजच्या आणि कालच्या सत्रात मिळून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1.03 व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 1.23 टक्क्यांनी वधारला आहे. 

दरम्यान, आज मुंबई शेअर बाजारातील रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, एसबीआय, आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, महाराष्ट्र बँक, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, ओएनजीसी, बजाज फायनान्स, एशियन पेंट, कोटक महिंद्रा बँक, डॉक्टर रेड्डीज, बँक ऑफ बरोडा, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, सेंट्रल बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, टीसीएस या कंपन्यांचे समभाग वधारल्याचे पाहायला मिळाले. तर एनटीपीसी, टायटन या कंपन्यांचे समभाग घसरले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Lok Sabha Election 2024: ‘’शहजाद्याला PM बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा’’; व्होट जिहादवरुन मोदींनी काँग्रेसला पकडलं कोंडीत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

SCROLL FOR NEXT