Share Market  
अर्थविश्व

Share Market Update : सत्र व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला 

दैनिक गोमंतक

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या चौथ्या आणि सलग दुसऱ्या सत्र व्यवहारात तेजी नोंदवली आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 0.53 टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळाले. आजच्या सत्रात सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई 48,512.77 वर खुला झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 14,522.40 च्या पातळीवर उघडल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दुपारच्या व्यवहारापर्यंत  घसरण झाल्यानंतर शेवटच्या सत्रात पुन्हा दोन्ही निर्देशांकानी उभारी घेतली. (The Sensex and Nifty gained in todays session)

आज देशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 259.62 अंशांनी वधारत 48,803.68 वर बंद झाला. त्यासोबतच देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 76.65 अंकांनी वाढून 14,581.45 च्या पातळीवर बंद झाला. त्यामुळे सलग दोन सत्र व्यवहारात मिळून सेन्सेक्स 920.30 अंकांनी व निफ्टी 270.65 अंशांनी वधारला आहे. यापूर्वी आठवड्याच्या पहिल्या सत्र व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 1,707.94 आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 524.05 अंशांनी उतरला होता. 

आठवड्याच्या पहिल्या सत्र व्यवहारात देशातील कोरोनाची (Corona) वाढती प्रकरणे आणि त्यासाठी निरनिराळ्या भागात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला होता. त्यामुळे एकाच सत्रात शेअर बाजाराने मोठी आपटी नोंदवली होती. त्यानंतर केंद्र सरकारने देशात परकीय लसींना परवानगी देण्याची घोषणा केल्यानंतर पुन्हा दोन्ही निर्देशांक सावरले आहेत. 

दरम्यान, आज मुंबई शेअर (Mumbai Share Market) बाजारातील रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एशियन पेंट, बजाज ऑटो, एनटीपीसी, एचसीएल टेक, ओएनजीसी, सन फार्मा, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, टीसीएस, डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांचे समभाग वधारले. तर इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, आयटीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा, महाराष्ट्र बँक, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बरोडा, मारुती सुझुकी, सेंट्रल बँक, इन्फोसिस, टायटन या कंपनीचे समभाग आजच्या व्यवहारात घसरले.     

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT