Secure the girl's future with the Sukanya Samriddhi Yojana on the new year

 

Dainik Gomantak

अर्थविश्व

नवीन वर्षात सुकन्या समृद्धी योजनेद्वारे मुलींचे भविष्य करा सुरक्षित

मुलींचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सरकारने 2014 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली.

दैनिक गोमन्तक

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे एक दिवस उरला आहेत. या नवीन वर्षात तुम्ही तुमच्या मुलीला किंवा बहिणीला पोस्ट ऑफिस योजना सुकन्या समृद्धी योजना भेट देऊ शकता. पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुलींना अनेक फायदे मिळतात. ही पोस्ट ऑफिस योजना मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी खास तयार करण्यात आली आहे. वडील किंवा भाऊ म्हणून तुम्ही या योजनेत तुमच्या मुलीसाठी किंवा बहिणीसाठी खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिस अंतर्गत नऊ लहान बचत योजना चालवल्या जातात. सुकन्या समृद्धी योजना ही पोस्ट ऑफिसच्या या लहान बचत योजनांपैकी एक आहे. या योजनेत तुम्ही अगदी कमी ठेवीसह खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिस (Post Office) बचत योजनांमध्ये, गुंतवणूकदाराला त्याच्या ठेवींवर चांगल्या व्याजदरासह सरकारी सुरक्षा देखील मिळते. याशिवाय तुम्हाला कर लाभही मिळतात. मुलींचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सरकारने 2014 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. या पोस्ट ऑफिस योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

कोण खाते उघडू शकतो

पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये, 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीच्या पालकाच्या वतीने खाते उघडले जाऊ शकते. पोस्ट ऑफिस किंवा भारतातील कोणत्याही बँकेत मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते.

ठेव रक्कम किती आहे

पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी 250 रुपये इतकी गुंतवणूक सुरू करता येते. या पोस्ट ऑफिस योजनेत जमा करण्याची कमाल रक्कम वार्षिक 1.5 लाख रुपये आहे. जर तुम्ही तुमच्या मुलीच्या किंवा बहिणीच्या लहान वयातच या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही त्यात १५ वर्षांसाठी पैसे जमा करू शकता.

व्याज किती आहे

पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवरून घेतलेल्या आकडेवारीनुसार, सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला वार्षिक ७.६ टक्के व्याजदराचा लाभ मिळतो. मिळालेले व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते. या पोस्ट ऑफिस योजनेत मिळणारे व्याज आयकर कायद्यानुसार करमुक्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT