ICICI Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी, ICICI बँकेने वाढवली विशेष एफडीची शेवटची तारीख

ICICI बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी 'ICICIC Bank Golden Year FD' या विशेष FD योजनेची अंतिम तारीख सहा महिन्यांनी वाढवली आहे.

Manish Jadhav

ICICI बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी 'ICICIC Bank Golden Year FD' या विशेष FD योजनेची अंतिम तारीख सहा महिन्यांनी वाढवली आहे. आता बँकेचे ग्राहक 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत या विशेष एफडी योजनेचा लाभ घेऊ शकतात. यापूर्वी ही एफडी योजना शुक्रवारी संपत होती.

ICICI बँक गोल्डन इयर्स FD वर व्याज

ICICI बँक (ICICI Bank) गोल्डन इयर्स FD सामान्य FD च्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर देते. सध्या 5 वर्ष एका दिवसापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर या विशेष एफडीवर 7.5 टक्के व्याज दिले जात आहे.

ICICI बँक गोल्डन इयर्स FD ची खास वैशिष्ट्ये

-या FD वर ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) उपलब्ध असलेल्या 0.50 टक्के व्याजदराव्यतिरिक्त, 0.10 टक्के व्याज मर्यादित काळासाठी दिले जात आहे.

-नवीन FD सह नूतनीकरणावर अतिरिक्त व्याजदर दिला जात आहे.

-या योजनेत फक्त दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेची एफडी करता येते.

-ICICI बँक गोल्डन इयर्स FD चा कार्यकाळ 5 वर्षांच्या एका दिवसापासून 10 वर्षांपर्यंत असू शकतो.

मुदत संपण्यापूर्वी तुम्ही पैसे काढू शकता

जर तुम्हाला FD केल्यानंतर पैशांची गरज असेल, तर तुम्ही या FD मध्ये 5 वर्षांनी आणि कालावधी पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी कोणतेही शुल्क न घेता पैसे काढू शकता. जर तुम्ही पाच वर्षापूर्वी पैसे काढले तर तुम्हाला 1 टक्के दंड भरावा लागेल.

तुम्ही फायदा कसा घेऊ शकता

तुम्हाला या विशेष योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास, तुम्ही बँकेच्या इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे एफडी करु शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या ICICI बँकेच्या शाखेलाही भेट देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT