Royal Enfield Bike Dainik Gomantak
अर्थविश्व

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Royal Enfield Meteor 350 Launch: रॉयल एनफील्डने आपल्या लोकप्रिय क्रूझर बाईक 'मीटिओर 350' ला भारतीय बाजारपेठेत अपडेटेड डिझाइन आणि नवीन फीचर्ससह लॉन्च केले.

Manish Jadhav

Royal Enfield Meteor 350 Launch: रॉयल एनफील्डने आपल्या लोकप्रिय क्रूझर बाईक 'मीटिओर 350' ला भारतीय बाजारपेठेत अपडेटेड डिझाइन आणि नवीन फीचर्ससह लॉन्च केले. बाईकची सुरुवातीची किंमत 1.96 लाख (एक्स-शोरुम) ठेवण्यात आली आहे. 2025 मध्ये आलेल्या या बाईकमध्ये कंपनीने पहिल्यांदाच इतके मोठे बदल केले आहेत. 2020 मध्ये पहिल्यांदा लॉन्च झाल्यापासून मीटिओर 350 ने जगभरात पाच लाखाहूंन अधिक युनिट्सची विक्री करुन एक मजबूत ग्राहक वर्ग तयार केला आहे. या नवीन अपडेट्ससह कंपनीने बाईकला अधिक आधुनिक आणि आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला.

व्हेरिएंट्स आणि किमती अपडेटेड

मीटिओर 350 चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. जसे की, फायरबॉल, स्टेलर, ऑरोरा आणि सुपरनोवा. प्रत्येक व्हेरिएंटची किंमत खालीलप्रमाणे आहे.

फायरबॉल: ₹1,96,252 (एक्स-शोरुम)

स्टेलर: ₹2,03,419 (एक्स-शोरुम)

ऑरोरा: ₹2,06,290 (एक्स-शोरुम)

सुपरनोवा: ₹2,15,883 (एक्स-शोरुम) हा टॉप मॉडेल आहे.

ग्राहकांना (Customers) त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार व्हेरिएंट निवडण्याची संधी यामुळे मिळते. बाईकची बुकिंग सुरु झाली असून डिलिव्हरी 22 सप्टेंबर 2025 पासून सुरु होणार आहे.

डिझाइनमधील महत्त्वपूर्ण बदल

रॉयल एनफील्डने नवीन लाइन-अपला अधिक आकर्षक बनवण्यासाठी कलर आणि डिझाइनवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

सुपरनोवा: हे मॉडेल मॉडर्न कलर पॅलेट आणि क्रोम डिटेलिंगसह येते, जे त्याला प्रीमियम लूक देते.

ऑरोरा: हेरिटेज कलर्ससह उपलब्ध आहे, ज्यामुळे त्याला एक विंटेज आणि क्लासिक फील येतो.

स्टेलर: डार्क आणि सिंपल कलर्समुळे या व्हेरिएंटला लो-की (Low-Key) आणि स्टायलिश लूक मिळतो.

फायरबॉल: जास्त आणि व्हायब्रंट कलर्समुळे हे मॉडेल तरुण रायडर्संना आकर्षित करते.

हे बदल बाईकला पूर्णपणे रीडिझाइन करत नसून तिच्या मूळ शैलीला कायम ठेवून तिला अधिक आकर्षक बनवण्यासाठी केले आहेत.

अफलातून फीचर्स

नवीन डिझाइनसोबतच बाईकच्या फीचर्समध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे रायडिंगचा अनुभव अधिक सुखद होतो. सर्व व्हेरिएंट्समध्ये आता स्टँडर्ड म्हणून LED इंडिकेटर्स, USB टाइप-C फास्ट चार्जिंग पोर्ट आणि असिस्ट-अँड-स्लिप क्लच देण्यात आले आहे. याशिवाय, या बेस व्हेरिएंट्समध्ये आता स्टँडर्ड LED हेडलॅम्प्स आणि ट्रिपर नेव्हिगेशन पॉड देखील जोडले गेले आहेत. तसेच, ऑरोरा आणि सुपरनोवामध्ये ॲडजस्टेबल लीव्हर्सचे फीचर्स जोडले आहे, जे रायडरसाठी अधिक सोयीस्कर ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT