Electric Royal Enfield Dainik Gomantak
अर्थविश्व

Electric Royal Enfield: रॉयल एनफील्डची 'ही' इलेक्ट्रिक बाईक करणार मोठा धमाका, जाणून घ्या कधी होणार लॉन्च अन् फीचर्स

Royal Enfield Flying Flea C6: रॉयल एनफील्डने त्यांची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल 'फ्लाइंग फ्ली सी6' 2026 च्या चौथ्या तिमाहीत लॉन्च करणार असल्याची पुष्टी केली आहे. ही बाईक पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान लॉन्च केली जाईल.

Manish Jadhav

रॉयल एनफील्डने त्यांची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल 'फ्लाइंग फ्ली सी6' 2026 च्या चौथ्या तिमाहीत लॉन्च करणार असल्याची पुष्टी केली आहे. ही बाईक पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान लॉन्च केली जाईल. C6 लॉन्च झाल्यानंतर लवकरच S6 देखील लॉन्च केली जाईल. सर्व नवीन इलेक्ट्रिक मोटारसायकली फ्लाइंग फ्ली ब्रँड अंतर्गत विकल्या जातील. मात्र रॉयल एनफिल्डने अद्याप स्पष्ट केले नाही की नवीन इलेक्ट्रिक वाहने त्यांचे टचपॉइंट विद्यमान डीलरशिप नेटवर्कशी शेअर करणार की नवीन डीलरशिप केवळ फ्लाइंग फ्ली ब्रँडसाठी सुरु केली जाईल.

दरम्यान, कंपनीकडे सध्या 200 हून अधिक लोकांची टीम आहे, जी फ्लाइंग फ्ली प्रोजेक्टवर काम करत आहे. त्यांनी यासाठी आधीच 45 पेटंट दाखल केले आहेत. सध्या या इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या अनेक चाचण्या सुरु आहेत. फ्लाइंग फ्ली इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च करण्याची योजना आखत आहे, जी शहरांमध्ये वापरण्यासाठी असेल. सध्या, कंपनीने येणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक्सबद्दल जास्त माहिती शेअर केलेली नाही, जसे की त्या किती रेंज देतील.

रॉयल एनफील्ड इलेक्ट्रिक बाईकचे फीचर्स

रॉयल एनफील्डने (Royal Enfield) पुष्टी केली की, ही बाईक ABS, क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि इतर आधुनिक इलेक्ट्रॉनिक फीचर्ससह येईल. तुम्ही तीन-पिन प्लगने घरी बाईक चार्ज करु शकाल. याशिवाय, येणाऱ्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये एलईडी लाइटिंग आणि डिजिटल डिस्प्ले सारखे अनेक फीचर्स असतील. रॉयल एनफील्डच्या फ्लाइंग फ्ली इलेक्ट्रिक बाईकमध्ये 5 रायडिंग मोड असतील. याच्या मदतीने तुम्ही रायडिंग ट्रॅकनुसार रायडिंग मोड निवडू शकाल. याशिवाय, बाईकमध्ये की-स्टार्ट फीचर असू शकते.

रॉयल एनफील्डच्या विक्रीत वाढ

रॉयल एनफील्डने पहिल्यांदाच एका वर्षात 10 लाखांहून अधिक बाईक विकून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, ज्यामुळे एकूण विक्री 10,02,893 युनिट्सवर पोहोचली आहे. वार्षिक आधारावर ही 10 टक्के वाढ आहे. देशांतर्गत विक्री 8.1 टक्क्यांनी वाढून 9,02,757 युनिट्सवर पोहोचली, तर आंतरराष्ट्रीय विक्री 29.7 टक्क्यांनी वाढली. रॉयल एनफील्डने एकूण 1,00,136 मोटारसायकली निर्यात केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT