RBI's action against Reliance  Dainik Gomantak
अर्थविश्व

...अखेर रिलायन्सवर RBI चा कारवाईचा बडगा

रिलायन्स कॅपिटल (Reliance Capital) लिमिटेडविरुद्ध गुरुवारी दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

अनिल अंबानींच्या (Anil Ambani) रिलायन्स कॅपिटल (Reliance Capital) लिमिटेडविरुद्ध गुरुवारी दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. कर्जबुडव्या RCL विरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरू करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) कडून मंजुरी मागितली आहे. आरबीआयने एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे.(RBI's action against Reliance)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी रिलायन्स कॅपिटल लिमिटेड विरुद्ध दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (IBC) च्या विविध कलमांखाली NCLT च्या मुंबई खंडपीठासमोर CIRP सुरू करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये RBI ने RCL विरुद्ध दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (IBC) च्या अनेक कलमांतर्गत कारवाई करण्यास मंजुरी मागितली आहे. आरबीआयने एनसीएलटीकडे अर्ज केल्याने, रिलायन्स कॅपिटलवर अंतरिम स्थगिती असेल. आणि यामध्ये, कर्जदार कंपनी आपली कोणतीही मालमत्ता हस्तांतरित किंवा विकू शकणार नाही.

उल्लेखनीय म्हणजे, 29 नोव्हेंबर रोजी आरबीआयने रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड बरखास्त केले होते आणि त्यांच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दुसऱ्याच दिवशी मध्यवर्ती बँकेने प्रशासकाच्या मदतीसाठी तीन सदस्यीय पॅनेल देखील तयार केले होते. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील आरसीएलवर कर्जाची देयके आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये चूक झाल्याचे अनेक गंभीर आरोप आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT