Bank Holiday Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Holidays: बँकेची रखडलेली कामं आताच करा... ऑक्टोबरमध्ये बँकांना असणार इतकी मोठी सुट्टी

Bank Holidays List: ऑक्टोबर महिन्यात एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये राज्याच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेने यादी प्रसिद्ध करुन दिली आहे.

Manish Jadhav

Bank Holidays in October 2023: ऑक्टोबर हा सणासुदीचा महिना आहे. तुम्हालाही ऑक्टोबर महिन्यात बँकेत जावे लागत असेल किंवा काही काम असेल, तर त्याआधी सुट्ट्यांची यादी जरुर पाहा.

ऑक्टोबर महिन्यात एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये राज्याच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेने यादी प्रसिद्ध करुन दिली आहे.

शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे

बँक सुट्ट्यांच्या यादीत 5 रविवार आणि 2 शनिवार देखील समाविष्ट आहेत. ऑक्टोबर महिन्यात अनेक बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

अशा परिस्थितीत बँकांशी संबंधित कोणतेही काम असेल तर ते वेळेवर आणि लवकरात लवकर पूर्ण करा.

ऑक्टोबर बँक सुट्ट्यांची यादी

2 ऑक्टोबर (सोमवार) – गांधी जयंती – राष्ट्रीय सुट्टी

14 ऑक्टोबर (शनिवार) – महालय – कोलकाता येथे बँका बंद आहेत.

18 ऑक्टोबर (बुधवार) – काटी बिहू – आसाममध्ये बँका बंद आहेत.

21 ऑक्टोबर (शनिवार) - दुर्गा पूजा (महा सप्तमी) – त्रिपुरा, आसाम, मणिपूर आणि बंगालमध्ये बँका बंद आहेत.

23 ऑक्टोबर (सोमवार) – दसरा (महानवमी)/आयुधा पूजा/दुर्गा पूजा/विजय दशमी – त्रिपुरा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, कानपूर, केरळ, जरकाखंड, बिहारमध्ये बँका बंद आहेत.

24 ऑक्टोबर (मंगळवार) – दसरा (विजयादशमी)/दुर्गा पूजा – आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद आहेत.

25 ऑक्टोबर (बुधवार) – दुर्गा पूजा – सिक्कीममध्ये बँका बंद आहेत.

26 ऑक्टोबर (गुरुवार) – दुर्गा पूजा (दसैन) / विलीनीकरण दिवस – सिक्कीम, जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद आहेत.

27 ऑक्टोबर, (शुक्रवार) दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद आहेत.

28 ऑक्टोबर (शनिवार) – लक्ष्मी पूजा – बंगालमध्ये बँका बंद आहेत.

31 ऑक्टोबर (मंगळवार) – सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन – गुजरातमध्ये बँका बंद आहेत.

शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील

1 ऑक्टोबरला रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत. याशिवाय 8, 15, 22 आणि 29 ऑक्टोबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील.

याशिवाय 14 आणि 28 ऑक्टोबरला दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

सुट्ट्यांची यादी पाहून नियोजन करा

ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्यांमुळे बँका बंद राहणार असून मोबाईल नेट बँकिंगच्या माध्यमातून लोक घरी बसून आपली कामे करु शकतील अशी सुविधा बँकेने उपलब्ध करुन दिली आहे, परंतु अशा परिस्थितीत एटीएममधून (ATM) पैसे काढताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

म्हणून, सुट्टीपूर्वी रोख रकमेची व्यवस्था करा. ऑक्टोबरमध्ये जवळपास 16 दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे सुट्ट्यांची यादी पाहूनच तुमचे नियोजन करा.

अधिकृत लिंक तपासा

बँक (Bank) सुट्ट्यांबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत लिंकला देखील भेट देऊ शकता https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx. येथे तुम्हाला दर महिन्याला प्रत्येक राज्याच्या बँक सुट्ट्यांची माहिती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT