Ravi Ruia 
अर्थविश्व

भारतीय अब्जाधीश उद्योगपतीने लंडनमध्ये खरेदी केला 1200 कोटी रुपयांचा अलिशान बंगला

लंडनमध्ये व्याजदर अधिक असल्याने लोकांना मोठ्या रकमेचे कर्ज घेता येत नाही.

Pramod Yadav

भारतीय अब्जाधीश रवी रुईया यांनी लंडनमध्ये 1200 कोटी रुपये किंमतीची (113 दशलक्ष युरो) आलिशान बंगला खरेदी केली आहे. हा बंगला रशियन गुंतवणूकदार आंद्रे गोंचारेन्को यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.

रवी रुईया यांनी घेतलेला बंगला अलीकडच्या काळात लंडनमधील हा सर्वात मोठी प्रॉपर्टी डील झाली आहे. पार्क रोड येथील हॅनोव्हर लॉज येथे हा बंगला विकत घेतला आहे.

दोन वर्षांपूर्वीपर्यंत या बंगल्याची मालकी गोंचरेन्को यांच्याकडे होती. गोंचरेन्को हे रशियन राज्य ऊर्जा कंपनीची उपकंपनी असलेल्या गॅझप्रॉम इन्व्हेस्ट युगचे उप सीईओ आहेत. गोंचरेन्को यांनी मालमत्तेची उर्वरित भाडेपट्टी त्यांनी 2012 मध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते राजकुमार बागडी यांच्याकडून 120 दशलक्ष युरोमध्ये विकत घेतली.

सध्या या मालमत्तेचे बांधकाम सुरू आहे. कौटुंबिक कार्यालयासाठी गुंतवणुकीचा पर्याय म्हणून हा बंगला विकत घेतला आहे. रुईया कौटुंबिक कार्यालयाचे प्रवक्ते विल्यम रेगो यांनी याबाबत माहिती दिली असून, फायनान्शिअल टाईम्सने याबाबत प्रथम बातमी दिली होती.

लंडनमध्ये व्याजदर अधिक असल्याने लोकांना मोठ्या रकमेचे कर्ज घेता येत नाही. यामुळे महागडी घरे घेणे सामान्य लोकांच्या आवक्याबाहेर असते. कर्जावर कमी अवलंबून असणारे लोकच महागडी लंडनमध्ये घरे घेतात.

नाईट फ्रँकच्या अहवालातील माहितीनुसार, 30 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या जगातील सुमारे 17 टक्के लोकांनी गेल्या वर्षी किमान एक घर खरेदी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT