Ration Card Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, आतापासून मिळणार कमी तांदूळ; सरकारने बदलला निर्णय

Free Ration On Card: केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून रेशनकार्डवर मोफत आणि स्वस्त रेशन दिले जात आहे.

Manish Jadhav

Free Ration On Card: केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून रेशनकार्डवर मोफत आणि स्वस्त रेशन दिले जात आहे. पूर्वी गरीब मजुरांची सोय लक्षात घेऊन रेशन दुकानांच्या वेळेत शासनाकडून बदल करण्यात आला होता.

आता उत्तराखंड सरकारने रेशनकार्डधारकांच्या गरजा लक्षात घेऊन आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे.

सरकारकडून करण्यात येत असलेल्या या बदलाचा फायदा पांढऱ्या आणि गुलाबी रेशनकार्डधारकांना होणार आहे. कार्डधारकांना एक किलो मडुवा (नाचणी) मोफत देण्याचा आदेश राज्य सरकारकडून देण्यात आला आहे.

मे महिन्यापासून एक किलो नाचणी दिली जाणार आहे

कार्डधारकांना सध्याच्या रेशनमध्ये एक किलो कमी तांदूळ दिला जाईल. त्याऐवजी मे महिन्यापासूनच एक किलो नाचणी दिली जाणार आहे. या संदर्भातील आदेशही राज्याच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाने जारी केला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून भरडधान्याला सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. त्या आधारे रास्त धान्य दुकानात कार्डधारकांना मडुवा मोफत देण्याची योजना आखण्यात आली.

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक (Customer) सचिवांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत.

10 ते 20 मे या कालावधीत रेशनचे वाटप करण्यात येणार आहे

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याचे रेशन 10 ते 20 मे दरम्यान वितरित केले जाईल. या महिन्याच्या रेशनमध्ये मडुवेचे वाटप केले जाणार आहे. रेशनकार्डधारकांच्या संख्येच्या आधारे मडुवेचे वाटप करण्यात येणार आहे.

राज्यात एकूण 13.91 लाख कार्डधारक आहेत. एका रेशनकार्डवर एक किलो मडुवा दिला जाईल. मात्र, तांदळाचे प्रमाण एक किलोने कमी केले जाईल. यापूर्वी यूपीमध्ये सरकारकडून रेशन मिळण्याची वेळ बदलण्यात आली होती.

तसेच, सरकारने (Government) रेशन वितरणाच्या वेळेत केलेल्या बदलानुसार आता रेशन दुकान सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यामुळे लोकांना आरामात रेशन घेता येणार आहे. वेळेतील बदलामुळे गरीब वर्गातील रोजंदारीवर काम करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यूपीमध्ये दर महिन्याला 13 ते 24 तारखेदरम्यान रेशनचे वाटप केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT