GoodFellows स्टार्टअपला रतन टाटा यांचा पाठिंबा Dainik Gomantak
अर्थविश्व

GoodFellows स्टार्टअपला रतन टाटा यांचा पाठिंबा

शंतनू नायडू यांना त्यांच्या कंपनीत 30 वर्षापर्यंतच्या तरुण पदवीधरांची नियुक्ती करायची आहे जे वृद्धाशी उत्तम संबंध निर्माण करू शकतात.

दैनिक गोमन्तक

जगातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी जे काम करतात ते संपूर्ण जागासाठी उदाहरण बनले आहे. रतन टाटा यांनी एका स्टार्टअपला आपला पाठिंबा दिला ज्यांचे संस्थापक दुसरे कोणी नसून त्यांचे व्यवसाय सहाय्यक आहेत. गुडफेलोचे (GoodFellows) संस्थापक शंतनू नायडू यांच्या स्टार्टअपला (Startup) रतन टाटा यांनी पाठिंबा दिला आहे.

गुडफेलो सध्या बिटा चाचणी टप्प्यात आहेत. शंतनू नायडू यांना त्यांच्या कंपनीत 30 वर्षापर्यंतच्या तरुण पदवीधरांची नियुक्ती करायची आहे जे वृद्धाशी उत्तम संबंध निर्माण करू शकतात. नायडू म्हणाले जी कंपनीचे कर्मचारी गुडफेलो म्हणून काम करतील जे वृद्धाना दैनंदिन कामात मदत करतील. त्यांचे कर्मचारी वृद्धाना केवळ किराणा सामान खरेदी करण्यातच मदत करतील असे नाही, तर गरज असेल तेव्हा त्यांना डॉक्टरांकडे घेवून जातील, त्यांना सध्याच्या तंत्रज्ञानाबद्दल शिकवतील आणि त्यांच्याशी संवाद साधतांना फेरफटका मारतील.

* रतन टाटा यांनी कंपनीचे संस्थापक आणि कर्मचाऱ्यांना हा संदेश दिला

शंतनू नायडू म्हणाले की, त्यांच्या कंपनीचे कर्मचारी वृद्धाचे सर्व कागदपत्रे, ईमेलचे कामही करतील. ही कंपनी जानेवारी 2022 पासून व्यावसायिक सेवा सुरू करणार आहे. लॉन्च केल्यानंतर , ही कंपनी आपल्या ग्राहकांकडून मासिक सब्सक्रिप्शन स्वरूपात शुल्क आकारेल. सहकारी शंतनू नायडू यांच्या या स्टार्टअपला पाठिंबा देत रतन टाटा यांनी ईमेलद्वारे एक निवेदन जारी केले आहे.ते म्हणाले,"आंतरपिढी मैत्री हा प्रकारचा, अर्थपूर्ण आणि प्रामाणिक मार्ग आहे. गुडफेलो एकाकी वृद्धाना सोबती म्हणून उबदारपनासह मदत करतो. गुडफेलो कशी प्रगती करतात हे पाहण्यासाठी मि उत्सुक आहे. शंतनू आणि त्याच्या युवा टीमला शुभेच्छा."

रतन टाटा यांनी अनेक स्टार्टअप्सना मदत देवून आर्थिक त्यांना प्रगतीपथावर नेण्याचे काम केले आहे. देखील केली मदत केली आहे. Airbnb, Bombay Hemp Company, Bluestone, Nestway, Paytm, Ola Electric या मोठ्या नावांचाही समावेश आहे ज्यांना रतन टाटा यांच्याकडून मदत मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचं 'बनावट' कारस्थान! खासदार फर्नांडिस कडाडले, "ते माझं ट्विट नाही, हा भाजपचा डाव"

Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! कराचीत भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 9 मुलांचाही समावेश Watch Video

"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

SCROLL FOR NEXT