Chief Minister Bhagwant Singh Maan Dainik Gomantak
अर्थविश्व

Punjab: भगवंत मान सरकारचा मोठा निर्णय, 14417 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या 'कन्फर्म'

Chief Minister Bhagwant Singh Maan: मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली पंजाब मंत्रिमंडळाने मंगळवारी राज्यातील 14,417 कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली.

Manish Jadhav

Chief Minister Bhagwant Singh Maan: मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने मंगळवारी राज्यातील 14,417 कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली.

राज्य सरकारने (Government) अस्थायी कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी धोरण मंजूर केल्याने 14,417 कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला.

'13 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आधीच निश्चित झाल्या आहेत'

मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 13,000 कर्मचाऱ्यांच्या (Employees) सेवा यापूर्वीच नियमित करण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या सरकारांनी 'गट सी' आणि 'ग्रुप डी' स्तरावरील पदांवर तात्पुरत्या आधारावर भरती केली होती. असे काही कर्मचारी 10 वर्षांहून अधिक काळ सेवेत आहेत.

'जे 10 वर्षे काम करतात ते नियमित होणार'

या धोरणांतर्गत किमान 10 वर्षे अखंड कालावधीसाठी तदर्थ, कंत्राटी, वर्क चार्ज्ड किंवा तात्पुरत्या स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित केले जाईल, असे प्रवक्त्याने सांगितले. विशेष संवर्गातील नियुक्तीवेळी अर्जदाराकडे नियमानुसार पदासाठी आवश्यक पात्रता आणि अनुभव असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT