Mahindra Thar Dainik Gomantak
अर्थविश्व

महिंद्राच्या लोकप्रिय गाड्यांच्या किंमती वाढल्या

महिंद्राची (Mahindra) सर्वाधिक लोकप्रिय ऑफ-रोडर SUV 'थार' (Thar) ची किंमत देखील वाढली.

दैनिक गोमन्तक

SUV कार निर्माता महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra) यांनी आता आपल्या गाड्यांचे भाव वाढवण्याचे निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या वाहनांच्या किंमतीत सुमारे दोन टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, महिंद्राची सर्वाधिक लोकप्रिय ऑफ-रोडर SUV 'थार' (Thar) या दुसर्‍या जनरेशनची किंमत 7 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा बोलेरो आता 2 ते 3 टक्के महाग झाली आहे, या कारची किंमत 22452 रुपयांवरून 22408 रुपयांनी वाढली आहे. त्याचबरोबर KUV 100 ची किंमत 2,672 रुपयांनी वाढली आहे. महिंद्रा मराझो देखील 2 टक्क्यांनी महागली आहे. त्यानुसार नवी किंमत 26,597 रुपयांपासुन ते 30,867 रुपयांपर्यंत वाढली आहे. तर स्कॉर्पियोची किंमत देखील 27,211 रुपयांवरून 37,395 रुपयांवर गेली असून 2 टक्क्यांनी महागली आहे.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारची कंपनीकडून सर्वाधिक किंमत वाढवण्यात आली आहे. त्यानुसार एसयूव्ही आता 92,000 रुपयांपर्यंत महाग झाली आहे. विशेष म्हणजे काही शहरांमध्ये कारसाठी तब्बल 1 वर्षांपेक्षा जास्त काळ वाट पहावी लागते आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढण्याचे महिंद्राचे लक्ष्य आहे. कोविड-19 निर्बंधांमुळे एसयूव्हीचे उत्पादन कमी झाले होते. महिंद्रा XUV 300 कॉम्पॅक्ट SUVची किंमत 2 टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे. ही SUV आता 3,606 रुपयांनी महाग झाली आहे. XUV 500 सेंकड टॉप SUVची किंमत 3,068 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT