Nirmala Sitharaman Press Conference Dainik Gomantak
अर्थविश्व

थोड्याच वेळात अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद, 'या' क्षेत्रांना मिळणार दिलासा

वित्त मंत्रालय पर्यटन, विमानचलन, अशा अनेक उद्योगांसह छोट्या उद्योगांना काही प्रमाणात दिलासा देण्याची घोषणाही अर्थमंत्री करतील अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमन्तक

अर्थमंत्री(Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत .या पत्रकार परिषदेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे कारण अर्थमंत्री आज काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने कोविड(Covid19) महामारीने रखडलेल्या क्षेत्रांसाठी काही मोठ्या घोषणा करू शकतात , वित्त मंत्रालय पर्यटन, विमानचलन, अशा अनेक उद्योगांसह छोट्या उद्योगांना काही प्रमाणात दिलासा देण्याची घोषणाही अर्थमंत्री करतील अशी अपेक्षा आहे.

कोविड महामारीमुळे देशाचा आर्थिक गाडा काही प्रमाणात थांबला आहे त्यातच आता विविध संस्था कर माफ करण्यासाठी सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करीत आहेत तसेच ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ गुड्स व्हीकल ओनर्स असोसिएशनने केंद्र सरकारला विनंती केली आहे की डिझेलच्या किंमतीतील त्वरित दरवाढ रोखली जावी आणि परिवहन क्षेत्राच्या चालक व कामगारांना प्राधान्यांच्या आधारे लसी द्यावी.

त्याचबरोबर त्यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पाठवलेल्या पत्रात कोविड १९ च्या परिणामामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी व सुधारात्मक कारवाई करण्यासाठी सर्वसमावेशक अभ्यास करण्याची मागणी देखील केली आहे.तसेच त्यांनी चालू आर्थिक वर्षात टोल फी, रस्ते कर, राज्य कर आणि इतर विविध करांमध्ये सूट जाहीर करण्याची विनंतीही युनियनने सरकारकडे केली आहे.

आता असे अनेक प्रश्न देशाच्या बहुतांश क्षेत्रात उभे टाकले आहेत त्यातच आता अर्थमंत्री काय घोषणा करतील आणि देशवासियांना काय दिलासा मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT