बचत गट  Dainik Gomantak
अर्थविश्व

महिलांसाठी बचत गटांचे सामर्थ्य

सुगंधीने ग्रामीण भागातल्या महिलांना (Women) बचत गटाच्या माध्यमातून सशक्तपणे संघटित केले.

दैनिक गोमन्तक

सुगंधीने ग्रामीण भागातल्या महिलांना (Women) बचत गटाच्या माध्यमातून सशक्तपणे संघटित केले. सुगंधी खांडोळा या लहानशा गावची. तिची आई तिच्या लहानपणातच वारली. सुगंधीची धाकटी बहीण आणि सुगंधी यांचं पालन-पोषण त्यांच्या वडिलांनीच केलं. त्यांचे वडील रोज न चुकता त्यांना शाळेत घेऊन जायचे. लोक तिच्या वडिलांना म्हणायचे, तु या मुलींना शाळेत का घेऊन जातोस? त्यांना घरकाम शिकव. त्या थोडीश्या मोठ्या झाल्या की त्यांचे लग्न करून दे. वडील काहीच बोलत नव्हते. त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही पण त्या दोघी मुली थोड्याफार शिकल्या.

आपली बारावी पूर्ण झाल्यावर सुगंधीने ग्रामीण महिला व मुलींबरोबर काम करायला सुरुवात केली. ती सांगते, ग्रामीण महिला परावलंबी असतात. मुलगी म्हणून घर सांभाळणे, भावंडाची सेवा करणे वगैरे कर्तव्ये नशिबाशीच बांधलेली असतात. ती शाळेत जाते खरी पण ती अर्धशिक्षिततच राहते. तिचे शिक्षण कमी असते म्हणून तिची ताकद कमी असते आणि त्यामुळे अनेकदा पुढे जायचे साहस तिला होत नाही. आधी मुलगी म्हणून घर सांभाळायचे नंतर लग्न करून बायको बनून घर सांभाळायचे. ग्रामीण महिला ही त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही कमजोर राहते. उद्योग करायचा म्हटलं तर उद्योगाचे प्रशिक्षण नाही, कुठली कला नाही. त्यात अंधश्रद्धांचीही भर असते. अशा कारणांमुळे ग्रामीण महिला मागे राहतात.

1991 पासून सुगंधाने ग्रामीण महिलांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. महिलांना संघटित करून स्वावलंबी बनवणे, पुरुषांच्या बरोबर आर्थिक जबाबदारी पेलण्यास सक्षम करणे हाच उद्देश होता.1996 मध्ये तिचे लग्न झाले. स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी तिने टेलिफोन बूथ घातला, झेरॉक्स मशीन घेतले. हळूहळू तिने महिलांना हस्तकलांचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. टेलरिंग, जूट बॅग, वेलवेट बॅग, शिंपल्याच्या वस्तू, नारळाच्या काथ्यापासून पायपुसणी इत्यादी. ‘सरस’ प्रदर्शन किंवा लोकोत्सवात मांडलेल्या स्टॉलमधून जेव्हां सामान विकलं जातं व महिला पैसे कमावून घरी परततात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असतो. घरातही त्यांना सन्मान मिळतो.

सुगंधीने आतापर्यंत वीस स्वयंसहाय्य गट तयार केले आहेत. या गटातल्या जवळजवळ साडेतीनशे महिला तिच्या संपर्कात असतात. या गटातल्या महिलांना, बचत गट कसा तयार करावा याबद्दलही तिने प्रशिक्षण दिले आहे. ग्रामीण महिला त्या निमित्ताने एकत्र येतात. असे एकत्र येणे महत्वाचे असते. गावात असलेली जत्रा, नाटक, देवकृत्ये, लग्न-बारसे ह्या निमित्ताने एकत्र येणे वेगळं असतं. तिथे त्यांचं संघटन होत नाही. \प्रत्येकजणी वेगवेगळ्या कारणासाठी थोड्या वेळापुरत्या तिथे जमलेल्या असतात. तिथे नियम आणि कायदे नसतात.

पण बचत गट तयार करताना त्यांचे एकत्र येणे हे वेगळे असते. ग्रामीण महिलांना बचत गट चळवळ म्हणजे काय हे कळते. बचत गट फक्त पैसे (Money) गोळा करण्यासाठी नसतो हे महिलांना आधी पटवून द्यावं लागतं. बचत गटाचा व्यवहार कसा असावा हे त्यांना समजून सांगावे लागते. बचत गटात काम केल्याने त्यांच्यातली एकता वाढते. बचत गटात नियमित भाग घेतल्याने महिलांना आत्मविश्वास येतो. त्यांची ताकद वाढते. त्या सक्षम बनतात. बचत गट हा महिलांना संघटित करण्याचे एक माध्यमच आहे.

सुगंधीने सहा जणींचा एक गट बनवला आहे. त्या ग्रामीण महिलांना (Women) विविध प्रशिक्षण देतात. या सहा जणीनी मिळूंन एक एक मोठे शिंपल्याचे झुंबर बनवले होते. त्याला गोवा सरकारचे त्याला 25000 रुपयांचे बक्षीस तर केंद्र सरकारकडून एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. हल्लीच शांतादुर्गा (Shantadurga) महिला संघटनेने तिचा सन्मान केला. तिचे लहान मोठे असे वेगवेगळे सत्कार झाले आहेत. सर्व बचत गट संघटित होऊन एक मोठी जनशक्ती निर्माण होण्याचे स्वप्न ती पाहते.

- भारती बांदोडकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: सुपरस्टार 'रोनाल्डो' खेळणार गोव्यात? चाहत्यांचे AFC लीगकडे लक्ष; FC Goa च्या गटात येण्याची आतुरता

Vote Chori: पत्ता नेपाळींचा, राहतात भलतेच! गोवा काँग्रेसची घराघरांत जाऊन पडताळणी; बोगस मतदारांची पोलखोल

Rashi Bhavishya 15 August 2025: कुटुंबात प्रेम वाढेल, आर्थिक स्थैर्य टिकवण्यावर भर द्या; महत्त्वाचे करार यशस्वी होतील

Independence Day Wishes in Marathi: बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो... स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' देशभक्तीभर शुभेच्छा

Betalbatim Beach: आधी जीवरक्षकाशी वाद घातला, पण त्याच 'जीवरक्षका'ने वाचवला जीव; बेताळभाटी किनाऱ्यावर पर्यटकाची बेफिकिरी!

SCROLL FOR NEXT